...तर पाकिस्तानच्या नागरिकांनाही चीनमधून बाहेर काढू : भारत सरकार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

दिल्ली : सध्या चीनमध्ये कोरोना व्हायरसने मोठा धुमाकूळ घातला आहे. अनेकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. चीनमध्ये वुहान शहरामध्ये या व्हायरसची सर्वांत पहिल्यांदा साथ आली. या ठिकाणी व चीनमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना परराष्ट्र मंत्रालयाने सुरक्षित बाहेर काढले आहे. आता जर पाकिस्तान सरकारने आम्हाला मदत मागितली तर आम्ही मदत करू असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.

दिल्ली : सध्या चीनमध्ये कोरोना व्हायरसने मोठा धुमाकूळ घातला आहे. अनेकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. चीनमध्ये वुहान शहरामध्ये या व्हायरसची सर्वांत पहिल्यांदा साथ आली. या ठिकाणी व चीनमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना परराष्ट्र मंत्रालयाने सुरक्षित बाहेर काढले आहे. आता जर पाकिस्तान सरकारने आम्हाला मदत मागितली तर आम्ही मदत करू असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.

वुहान शहरातून सर्व भारतीय नागरिकांना एअर इंडियाच्या विमानाने 'एअरलिफ्ट' करण्यात आले आहे. या सर्वांना लष्कराच्या रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. या अनुषंगाने परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी पत्रकार परिषद घेत वुहानमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढणे कठीण होते असे म्हटले आणि चीनने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभारही मानले.

'कोरोनापासून जगाला वाचवायचंय तर..'; 6 कोटी नागरिकांबाबत चीन सरकारचा मोठा निर्णय!

तसेच पाकिस्तान सरकारने मदत मागितली तर आम्ही वुहानमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी नागरिकांनाही सुरक्षित बाहेर काढू असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रकक्ते रवीश कुमार यांनी म्हटले. वुहानमध्ये भारताचे 640 नागरिक अडकले होते. यात विद्यार्थी, पर्यटक आणि काही व्यापाऱ्यांचाही समावेश होता. या सर्वांना एअर इंडियाच्या दोन विमानांनी एअर लिफ्ट करण्यात आले. यापार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी चीनमध्ये काही पाकिस्तानी अडकले असून त्यांनी भारत सरकारकडे मदत मागितली आहे, तर यावर काय चर्चा झाली? असा प्रश्न विचारला असता रवीश कुमार म्हणाले की, ''पाकिस्तानकडून असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. जर तशी परिस्थिती उद्बवतील तर आम्ही यावर नक्की विचार करू.''

पत्रकार परिषदेमध्ये रवीश कुमार यांना एका पत्रकाराने विचारले की, वुहानमध्ये अडकलेले पाकिस्तानी विद्यार्थी भारताची प्रशंसा करत आहेत, 'मोदी है तो मुमकिन है', 'मोदी झिंदाबाद…' अशा घोषणा देत आहेत.

मोठी ब्रेकिंग : चीन 20 हजार कोरोनाग्रस्तांना ठार मारणार?; कोर्टाकडे मागणी

पाकिस्तान सरकार आम्हाला बाहेर काढत नसेल तर भारतीय सरकारने आम्हाला मदत करावी असे ते विद्यार्थी म्हणत आहेत, यावर काय चर्चा झाली? याला उत्तर देताना रवीश कुमार म्हणाले की, सध्या पाकिस्तान सरकारकडून असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, परंतु जर अशी परिस्थिती तयार झाली तर आमच्याकडे तशी साधनसामग्री असून यावर नक्की विचार करू.

ई-व्हिसा आता वैध नाही
चीनच्या नागरिकांना देण्यात आलेले सर्व ई-व्हिसा आता वैध नाहीत असे रवीश कुमार यांनी सांगितले. तसेच जे नॉर्मल व्हिसा देण्यात आले आहेत, तेही अधिकृत नाहीत. जर एखाद्या व्यक्तीला भारतात येणं अगदीच तातडीचे असेल तर ते भारतीय दुतावासाशी संपर्क साधून व्हिसासाठी अर्ज करू शकतात. तसेच भारत आणि चीन दरम्यानच्या व्यावसायिक उड्डाणांवर कोणताही प्रतिबंध घालण्यात आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We will also help the Government of Pakistan says indian Foreign Ministry