'कोरोनापासून जगाला वाचवायचंय तर...'; 6 कोटी नागरिकांबाबत चीन सरकारचा मोठा निर्णय!

Hubei-Wuhan-Lackdown
Hubei-Wuhan-Lackdown

वुहान : संगीतकार असलेल्या झांग यारूच्या आजीचे सोमवारी निधन झाले. ती कोमात होती. हॉस्पिटलने तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला होता. जॉन चेन महाविद्यालयीन पदवीधर आहे. त्याच्या आईला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. ती इतकी कमकुवत झाली आहे की, तिला उपचारासाठी हॉस्पिटल बाहेरील रांगेत उभे राहता येत नाही. 

दुसरीकडे 30 वर्षीय डॉक्टर स्वत: शेवटचे श्वास घेत आहे. हे हृदय हेलावून टाकणारं दृश्य आहे चीनच्या हुबेई प्रांतातील. हुबेईची लोकसंख्या आहे 6 कोटी. आणि याच 6 कोटी लोकांच्या जीवनाबाबत चीन सरकारने मोठा निर्णय घेत त्यांना त्यांच्या नशिबावर सोडून दिले आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेले तब्बल 97 टक्के नागरिक येथील स्थानिक नागरिक होते.

सध्या माध्यमांमध्ये एका शहराचं नाव वारंवार येत आहे, ते म्हणजे वुहान. हे वुहान शहर हुबेई प्रांताच्या राजधानीचे ठिकाण आहे. संपूर्ण चीनमध्ये ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यापैकी 67 टक्के लोक हे हुबेईचे आहेत. आणि दिवसेंदिवस मृतांची संख्या वाढत चालली आहे. याचा बोजा स्थानिक आरोग्य यंत्रणेवरही आला असून त्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. हॉस्पिटलमध्ये पाय ठेवायलाही जागा नाही. अशी तेथील सद्यस्थिती आहे. कोरोनाचा जगातील पहिला बळी याच ठिकाणचा असल्याने 23 जानेवारीपासून हा पूर्ण प्रांतच जगावेगळा करून टाकला आहे. 

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी कडक आदेश जाहीर केले आहेत. त्यानुसार हुबेई प्रांत सोडून कोणीही बाहेर जाऊ शकत नाही. संपूर्ण जगाला या व्हायरसपासून वाचविण्याचा त्यामागचा मानस आहे. वुहानचे माजी उपमहासंचालक यांग गाँगहून म्हणाले की, जर पूर्ण प्रांतच सील केला नसता, तर जे कोरोनाग्रस्त आहेत, ते इतरत्र उपचारासाठी गेले असते. त्यामुळे पूर्ण चीन देश या व्हायरच्या भक्ष्यस्थानी पडला असता. यामुळे जरी जनजीवन विस्कळीत झाले असले तरी असे करणे गरजेचे होते. असं समजा की, आपण कोरोनाविरुद्ध युद्ध करत आहोत. 

जेव्हा हा विषाणू पसरण्यास सुरवात झाली, तेव्हा काही दिवसांपर्यंत कोणालाही याची कल्पना नव्हती. यामुळे तो वेगाने पसरला. गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात हा व्हायरस वुहानच्या फूड मार्केटमधून पसरला असल्याचे दिसून आले. प्राण्यांद्वारे माणसांना या व्हायरसची लागण झाल्याचे डॉक्टरांनी म्हटले होते. जानेवारीमध्ये सरकारने सार्वजनिक कार्यक्रम, उपक्रम रद्द केले नाहीत. त्यामुळे याचा आणखी प्रसार झाला. चीनमधील लूनर न्यू इयर सेलिब्रेशन नंतर याचे परिणाम समोर आले, मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

वुहान युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजीमधील प्राध्यापक जेंग यान म्हणतात की, कोरोना हा शांत वादळासारखा आला. आणि बघता बघता त्याने अख्ख्या हुबेई प्रांतालाच विळखा घातला. सध्या हुबेईमध्ये 110 आयसीयू हॉस्पिटल आहेत. पण तेथे पाय ठेवायला जागा नाही, अशी सद्यस्थिती आहे. नाकाबंदी केल्यामुळे हातमोजे, संरक्षण होईल अशा कपड्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. नागरिकांना कमी पाणी पिण्याचे आदेश दिले आहेत. 

लायबेरियाचा रेकॉर्ड मोडला

या अगोदर 2014 मध्ये ईबोला या संसर्गजन्य रोगामुळे लायबेरियातील प्रभावित भाग इतर जगापासून वेगळा करण्यात आला होता. त्यामुळे तेथे दंगलीही उसळल्या होत्या. पेकिंग लॉ स्कूलचे प्राध्यापक झ्यांग क्यानफान यांनी असे म्हटले आहे की, लॅकडाऊनचा अर्थ असा नाही की, लोकांना मरण्यासाठी सोडले जाते. उलट त्याठिकाणाहून रोगाचा प्रसार इतर ठिकाणी होऊ नये. तसेच मर्यादित भागातच त्याच्यावर नियंत्रण आणले जावे, हा त्यामागचा उद्देश असतो. 

वुहान शहरात एक कोटीहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. हे द्वितीय श्रेणीमध्ये मोडणारे शहर विकासाच्या बाबतीतही शांघाय, बीजिंग आणि गुआंगझाऊ या शहरांच्या पाठीमागे आहे. सध्या 8000 सरकारी वैद्यकीय कर्मचारी हुबेईमध्ये कार्यरत असून त्यांना औषधे आणि इतर गोष्टींची कमतरता पडू नये, याकडे लक्ष्य दिले पाहिजे. मेडिकल स्टोअर चोवीस तास खुली आहेत. मात्र, लोकांमधील निराशा वाढत चालली आहे.

रक्त-लघवी तपासणीसाठी नमुना द्यायचा असेल, तर त्यासाठी सुमारे आठ तास रांगेत उभे राहावे लागत आहे. तरीही, याठिकाणी कोणता वादविवाद नाही किंवा दंगल उसळू शकेल, अशी परिस्थिती नाही. कारण चीनमधील लोक सरकारविरोधात लगेच आवाज उठवू शकत नाहीत, अशी माहिती एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com