Weather: उत्तर भारतात पुन्हा थंडीची लाट; 6 जानेवारीपर्यंत थंडीचा येलो अलर्ट

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी थंडीचं थैमान
Weather
Weatheresakal

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी थंडीने पुन्हा एकदा राष्ट्रीय राजधानी पंजाब, हरियाणासह संपूर्ण उत्तर भारतात थैमान घालणार आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये शनिवारी दिवसभर उन्हामुळे थंडीपासून थोडासा दिलासा मिळाला असला.

तरी सायंकाळी उशिरा वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात झालेल्या बदलामुळे कमाल तापमानात घट झाली. रविवारी सकाळी किमान तापमानात घट होण्याची शक्यता असून, अनेक भागात सकाळी धुके पडेल. डोंगरावर बर्फवृष्टी झाली आहे, त्यामुळे वारे वाहतील, त्यानंतर थंडीही वाढेल.

Weather
नवीन वर्षात मोठी दुर्घटना; रुग्णालयाला लागली भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, अनेक जण बचावले

प्रादेशिक हवामान केंद्र, नवी दिल्लीच्या मते, शनिवारी दिल्लीतील कमाल तापमान 19.7 अंश सेल्सिअसवर सामान्यपेक्षा एक अंशाने कमी होते आणि किमान तापमान 10.2 अंश सेल्सिअसवर सामान्य तापमानापेक्षा तीन अंशांनी जास्त होते.

गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमान 10 अंशांच्या आसपास आहे. त्याचबरोबर कमाल तापमान 20 अंशांच्या आसपास चालू आहे.

हवामान खात्यानुसार रविवारपासून किमान तापमानात पुन्हा घसरण सुरू होईल. 3 जानेवारीपर्यंत तापमान चार अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, ते 6 जानेवारीपर्यंत कायम राहणार आहे.

6 जानेवारीपर्यंत थंडीची लाट आणि थंडीच्या दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर-पश्चिम भारतात थंडीची ही लाट कायम राहणार असून त्याचा परिणाम पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दिल्लीवर होईल.

Weather
Sanjay Raut : 'नव्या वर्षात बेकायदा सरकार घरी गेलेले दिसेल' राऊतांचं भाकीत

पंजाब, हरियाणामध्ये थंडी कायम, भटिंडा सर्वाधिक थंड

पंजाब आणि हरियाणाच्या बहुतांश भागात थंडीची लाट कायम आहे. पंजाबमधील भटिंडा हे 3.5 अंश सेल्सिअस किमान तापमानासह राज्यातील सर्वात थंड ठरले. अमृतसरमध्ये शुक्रवारी पारा ४.३ अंशांवर घसरला.

चंदीगडमध्ये ७.१ अंश तापमानाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे हिसारमध्ये 6.6 अंश सेल्सिअस, कैथलमध्ये 7.9, कर्नालमध्ये 8.4 आणि हरियाणातील अंबालामध्ये 8.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राजस्थानच्या अनेक भागात पारा घसरला, थंडीची लाट येण्याची शक्यता

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी जयपूर, बिकानेर आणि भरतपूरसह राजस्थानच्या अनेक भागात पारा घसरला. किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसची घसरण नोंदवण्यात आली आहे.

शुक्रवारी रात्री फलोदी येथे ४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बिकानेर, जयपूरसह अनेक भागात सकाळी दाट धुके होते. येत्या दोन दिवसांत किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. यासोबतच राज्याच्या पश्चिम आणि उत्तर भागात दाट धुके राहील.

Weather
Road Accident : शिमल्यात नववर्ष साजरं करण्यासाठी जाणाऱ्या मित्रांच्या कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, चार जखमी

काश्मीरमध्ये थंडीपासून काहीसा दिलासा

जम्मू-काश्मीरमधील अनेक भागांना कडाक्याच्या थंडीपासून दिलासा मिळाला असून किमान तापमान गोठणबिंदूच्या वर पोहोचले आहे. श्रीनगरमध्ये शुक्रवारी रात्री ०.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली, जी गुरूवारच्या रात्रीच्या ०.३ अंशांपेक्षा जास्त आहे.

पहलगाम येथे उणे 9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आणि ते केंद्रशासित प्रदेशातील सर्वात थंड ठिकाण होते. गुलमर्गमध्ये 8 अंश सेल्सिअस तापमान होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस बहुतांश भागात हवामान कोरडे राहील. त्यानंतर किमान तापमानात पुन्हा घसरण होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com