Rain Update: कर्नाटकात 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट ; 25 तारखेपर्यंत मुसळधारेचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rain update

Karnataka Rain Update: कर्नाटकात 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बेळगावसह (Belguam) राज्यातील 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. तर 9 जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बंगळूर, बंगळूर ग्रामीण, चिक्कबळ्ळापूर, हासन, कोडगू, कोलार, मंड्या, रामनगर, शिमोगा येथे (Bangalore, Bangalore Rural, Chikkaballapur, Haasan, Kodagu, Kolar, Mandya, Ramnagar, Shimoga) शुक्रवारी सकाळी 8.30 पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिवाय 25 तारखेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

तमिळनाडूमध्ये (Tamilnadu) उष्णतेची लाट आल्याने गोव्यासह (Goa) कोकणातील दोन जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळत आहे. त्याचबरोबर बेळगाव, कारवार, मंगळूर, उडपी, धारवाड, गदग, हावेरी, चामराजनगर, म्हैसूर जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने केरळसह 7 राज्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 20 नोव्हेंबरपर्यंत पाऊस येणं अपेक्षित असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे.

हेही वाचा: Weather Update: 48 तासांत पाऊस ओसरणार ; आठवड्याभरात थंडी वाढणार

केरळच्या अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. एकाठिकाणी उत्तर भारतात सर्दी वाढण्यास सुरुवात झाली तर दुसरीकडे दक्षिण भारतात पावसाचा जोर दिसून येतोय. हवामान विभागाच्या म्हणण्याप्रमाणे, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, पुद्दुचेरी, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि गोव्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबामुळे या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

loading image
go to top