Monsoon Season : यंदाही मॉन्सूनचं वेळापत्रक बदललं; खरीप हंगामातील शेतीवर होणार परिणाम

यंदा मॉन्सूनची प्रतीक्षा अजून काही कालावधीसाठी वाढली जाण्याची शक्यता आहे.
Weather Update Monsoon
Weather Update Monsoonesakal
Summary

मानव जातीला पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीसाठी लागणारे नैसर्गिक पाणी आणि त्याचे साठे संपुष्टात येण्याच्या दिशेने वाटचाल करू लागले आहेत.

कणकवली : मागील पाच-दहा वर्षांमध्ये जागतिक तापमान वाढीचा परिणाम मॉन्सूनच्या (Monsoon) आगमनावर थेटपणे पडू लागला आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या आगमनाचे वेळापत्रक बदलले असून आता मॉन्सून आणि मृग नक्षत्र यांचे पारंपरिक संबंध संपुष्टात आल्याचे चित्र गेल्या काही वर्षांत स्पष्ट होऊ लागले आहे.

त्यामुळे यंदा मॉन्सूनची प्रतीक्षा अजून काही कालावधीसाठी वाढली जाण्याची शक्यता आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात ४० अंश पार तापमान वाढल्याने त्याचे दूरगामी परिणाम आता निसर्गसंपन्न कोकणलाही भोगावे लागणार आहेत.

Weather Update Monsoon
Mumbai : दीड वर्षाची चिमुरडी आईच्या कुशीत निजलेली, तितक्यात अपहरणकर्त्यानं..; रेल्वेतील थरारक घटना समोर

देशभरात सर्वाधिक पाऊस कोकण प्रदेशांमध्ये (Weather Update) पडत असे. पारंपरिक पद्धतीने खरीप हंगामातील भात शेती हा कोकण प्रदेशातील आर्थिक उत्पन्नाचा कणा मानला जात होता. अलीकडच्या कालावधीत फळबागायतीने जोर धरला; पण शेती, शेतीपूरक व्यवसाय आणि मासेमारी ही कोकणवासीयांची वेगळी ओळख होती. गेल्या दशकापासून ही ओळख हळूहळू संपुष्टात येऊ लागली आहे. याचे कारण मानव आणि निसर्गाचे नाते तुटू लागले आहे.

गेल्या चार-पाच वर्षांत उन्हाळी हंगामातील तापमानही कमालीचे वाढले आहे. याला जागतिक तापमान वाढीचा परिणाम म्हणून पाहिले जाते; पण या परिणामाचे आता दुष्परिणामही सोसावे लागत आहेत. यंदाच्या वर्षात चक्रीवादळाचे प्रमाणही वाढले आहे. समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या नैऋत्य मॉन्सूनवर याचा परिणाम होऊ लागला आहे. हे अलीकडे सातत्याने होत असून आता याचे दुष्परिणाम जाणू लागले आहे.

Weather Update Monsoon
Cyclone Biparjoy : अरबी समुद्रात चक्रीवादळ; 12 जूनपर्यंत समुद्र खवळलेलाच राहणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

साधारण २०२१ मध्ये ९ जूनला मॉन्सून दाखल झाला होता; मात्र २०१९, २०२० आणि २०२२ या वर्षांत माॅन्सूनने आपले नेहमीचे वेळापत्रक बदलल्याचे पाहायला मिळाले. यंदाही हीच परिस्थिती उद्भवली आहे. वाढता उष्मा, चक्रीवादळे आणि निसर्गाचे बदललेले संतुलन हीच त्याची महत्त्वाची कारणे आहेत. निसर्गसंपन्न कोकण सुध्दा या दुष्टचक्रात आता अडकू लागले आहे.

Weather Update Monsoon
Monsoon Season : मिरगाचा मुहूर्त टळला, आता पाऊस आणखी एक आठवडा लांबणार? शेतकरी चिंतेत

पूर्वी वैशाख महिन्यात वळवाचा पाऊस कोसळत असायचा. त्यानंतर ज्येष्ठ महिन्यात पावसाची हजेरी लागल्यानंतर नियमित मॉन्सून हा मृग नक्षत्रापासून हजेरी लावायचा; मात्र हे चित्र अलीकडच्या कालावधीत पूर्णतः बदलून गेले आहे. यामुळे शेतीच्या खरीप हंगामाबरोबर रब्बी हंगामावरही आता परिणाम जाणू लागला आहे. पाणीटंचाई तर नित्याचीच झालेली आहे.

मानव जातीला पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीसाठी लागणारे नैसर्गिक पाणी आणि त्याचे साठे संपुष्टात येण्याच्या दिशेने वाटचाल करू लागले आहेत. आता सर्वसामान्य जनतेला जबाबदारीने पावले टाकावी लागणार आहेत. प्लास्टिकचा अतिरिक्त वापर, वाढलेल्या वाहनातून होणारे कार्बनचे उत्सर्जन, अतिरिक्त पाण्याचा वापर ही प्रमुख कारणे आता ठळक दिसू लागली आहेत.

Weather Update Monsoon
Karnataka : बुद्ध-बसव-आंबेडकरांना मानणारा नेता बनला बेळगावचा 'पालकमंत्री'; मुख्यमंत्र्यांकडून नियुक्ती

गेल्या काही वर्षांत मॉन्सूनचे आगमन

  • २०१८ ८ जून

  • २०१९ २२ जून

  • २०२० १२ जून

  • २०२१ ९ जून

  • २०२२ १६ जून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com