
Monsoon Update : राज्यातील सहा तालुक्यांत २०० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस
अहमदाबाद : दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रामध्ये पावसाची संततधार कायम असून आज सकाळी सहा वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत सहा तालुक्यांत २०० मि.मी.हून अधिक पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने येत्या २४ तासांत दक्षिण गुजरात व सौराष्ट्रमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गुजरातेत मॉन्सून अजूनही चांगलाच सक्रिय असून शुक्रवारी गुजरातेतील वलसाड आणि नवसारी जिल्ह्यांत आणि सौराष्ट्र विभागातील गीर सोमनाथ जिल्ह्यात मोठ्या पावसाची नोंद झाली. चिखली(जि.नवसारी)२४४ मि.मी., सूत्रपदा (जि. गीर सोमनाथ)२४० मि.मी, गांदेवी (जि.नवसारी) २३१ मि.मी. आदी तालुक्यांत २०० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस पडला.
आंध्रात पूरस्थिती गंभीर
आंध्र प्रदेशात गोदावरी नदीतून शुक्रवारी सकाळपर्यंत सुमारे १९ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नदीच्या किनाऱ्यावरील शेकडो गावांत आत्तापर्यंतची सर्वांत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे.
ओडिशात पावसाची तूट दूर
यंदाच्या पावसाळ्यात कमी पावसाचा सामना करणाऱ्या ओडिशावर वरुणराजाने अखेर चांगलीच बरसात केली आहे. राज्याच्या किनाऱ्याजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जोरदार पडला.
Web Title: Weather Update Rain Forcast Gujrat More Than 200 Mm Rainfall In Six Talukas Heavy Rain In Gujrat
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..