
Weather Updates: दिल्लीत आजही पाऊस; या राज्यांमध्ये गारपीटांचा मारा
दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसामुळे थंडी अचानक वाढली आहे. भारतीय हवामान खात्याने अनेक राज्यांमध्ये सोमवारीही पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तर काही राज्यांमध्ये गारपीटांचा मारा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (Weather Updates IMD Rain Alert )
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-एनसीआर, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये आज पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर हिमालयीन भागात मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. याशिवाय, पुढील २४ तासांत जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, हिमाचल आणि यूपीच्या काही भागात गारपीट होऊ शकते.
दिल्लीत ढगाळ वातावरण राहणारस आहे. दिल्लीत आज किमान तापमान 10 अंश सेल्सिअस आणि कमाल 20 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
मंगळवारी थंडी वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, मंगळवार आणि बुधवारी किमान तापमान 8 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कमाल तापमान 22 अंशांपर्यंत जाऊ शकते. मात्र, आठवड्याच्या अखेरीस किमान तापमान 10 अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.