IMD Red Alert : 'या' तारखेपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; किनारपट्टी भागात रेड ॲलर्ट जाहीर

Weather Updates : गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ किनारपट्टीवर पाऊस पडत आहे.
IMD Red Alert
IMD Red Alert esakal
Updated on: 
Summary

बंगालच्या उपसागरात १९ जुलै रोजी कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

बंगळूर : राज्याच्या किनारपट्टी भागात पावसाचा धुमाकूळ सुरू असल्याने भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) ‘रेड ॲलर्ट’ आजपर्यंत (ता. १८) वाढवला आहे. मात्र, दक्षिण कर्नाटकात पावसाची तीव्रता कमी झाल्यामुळे ‘रेड ॲलर्ट’ (Red Alert) मागे घेतला असून २० जुलैपर्यंत ‘ऑरेंज ॲलर्ट’ जाहीर केला आहे. मंगळूर जिल्ह्यात १९ जुलैपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ किनारपट्टीवर पाऊस पडत आहे. बंगालच्या उपसागरात १९ जुलै रोजी कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे १७ जुलै ते २१ जुलै दरम्यान सर्व किनारपट्टी आणि दक्षिणेकडील अंतर्गत जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. मंगळूर, कारवार आणि उडुपी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे ‘रेड अलर्ट’ जाहीर केला आहे.

IMD Red Alert
वाघनखांच्या सुरक्षिततेसाठी बुलेट प्रूफ काचपेटी, मेटल डिटेक्टर, CCTV कॅमेरे अन् मोठा पोलिस बंदोबस्त; किती महिने पाहता येणार वाघनखं?

चिक्कमगळूर, कोडगू आणि शिमोगा जिल्ह्यांसाठी ‘रेड ॲलर्ट’ जारी केला आहे. भूस्खलन, पुराचा इशारा दिला आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे बेळगाव, हासनमध्ये यलो अलर्ट जाहीर केला आहे. बंगळूरमध्ये २० जुलैपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडेल. किनारी भागात जोरदार वारा आणि पाऊस होणार असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. बंगळूरमध्ये पुढील दोन दिवस ढगाळ आकाश राहील. हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

सतत वाऱ्याचा वेग (३०-४० किमी ताशी) पोचण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २७ डिग्री सेल्सिअस आणि २१ डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कारवार तालुक्यात गेल्या २४ तासांत तीन घरांची पडझड झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. एका घराचे गंभीर तर १८ जणांचे अंशत: नुकसान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

IMD weather forecast 29 September 2026 rain alert
Yellow Alert in Maharashtra Districts
21 States Rain Alert
Maharashtra, MP and Rajasthan Rain Alert
Marathi News Esakal
www.esakal.com