ओमिक्रॉनची वाढती रूग्णसंख्या, राजधानी दिल्लीत विकेंड कर्फ्यू | Delhi Government announced weekend Curfew | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi Government announced weekend Curfew

ओमिक्रॉनची वाढती रूग्णसंख्या, राजधानी दिल्लीत विकेंड कर्फ्यू

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील कोरोना आणि ओमिक्रॉन (Corona Cases In India) रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे दिल्लीमध्ये विकेंड (Weekend Curfew In Delhi ) कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांत राजधानीत 4000 हून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal Corona Positive) हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. या आठवड्यापासून वीकेंड कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. दिल्लीत शुक्रवारी रात्री १० ते सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत वीकेंड कर्फ्यू लागू राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Weekend Curfew Imposed In Delhi)

हेही वाचा: केंद्राच्या नियमानुसार लॉकडाऊन लावावं लागेल - पेडणेकर

सरकारी कर्मचारी घरून काम करतील

यापूर्वी दिल्लीमध्ये नाईट कर्फ्यू (Night Curfew In Delhi) लागू करण्यात आला होता. त्यानंतर दिल्ली डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी (DDMA) ची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यात वेगाने वाढणारी कोरोनाची (Corona Cases In Delhi) रूग्णसंख्या लक्षात घेता कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्याता आला होता. वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांनाच यातून सूट दिली जाणार आहे. तर, खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचीदेखील कार्यालयातील संख्या 50% वर आणण्यात येणार आहे. (Delhi weekend Curfew Updates)

हेही वाचा: लग्न सोहळे अंगाशी? महाविकास आघाडीतील 13वे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

एम्सने सुट्ट्या रद्द केल्या

कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहता दिल्ली एम्सने हिवाळी सुट्ट्या (5 ते 10 जानेवारी) रद्द केल्या आहेत. एम्सने सर्व कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर कामावर परतण्यास सांगण्यात आले आहे. सोमवारी दिल्लीत कोरोनाचे 4099 नवीन रुग्ण आढळून आले असून राज्याचा सकारात्मकता दर आता 6.46% वर पोहोचला आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवी नियमावली

देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णाची (Corona) संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनची (Lock down) छाया गडत होत चालली आहे. त्यातच आलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटने संसर्गाचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे अधिकच चिंतेत भर पडली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियमाली जारी करण्यात आली आहे. सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्के इतकीच ठेवण्यात यावी, उर्वरीत कर्मचाऱ्यांना work from home देण्यात यावे, असे नियमालीत केंद्र सरकारने म्हटले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top