Kishori Pednekar Statement On Mumbai Lockdown | ...तर केंद्राच्या नियमानुसार लॉकडाऊन लावावं लागेल! - किशोरी पेडणेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kishori Pednekar Statement On Mumbai Lockdown

केंद्राच्या नियमानुसार लॉकडाऊन लावावं लागेल - पेडणेकर

मुंबईतील वाढती कोरोनाची रुग्णसंख्या पाहता महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेने भरवलेले कार्यक्रम रद्द केल्याची माहिती दिली. सध्या वाढणारे रुग्ण हा चिंतेचा विषय असून त्याच पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला, असं त्यांनी म्हटलं. (Kishori pednekar on Mumbai Lockdown)

पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल (Iqbal Singh Chahal) यांनी मुंबईतील रुग्णसंख्या 20 हजारांच्या वर गेल्यास लॉकडाऊन लावण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. त्यावर लॉकडाऊन असता कामा नये, अशी भूमिका महापौरांनी मांडली. आयुक्त आणि मनपा सर्व परिस्थितीवर लक्ष्य ठेऊन आहोत, असे त्या म्हणाल्या. (Mumbai Lockdown)

मात्र झपाट्याने रुग्णसंख्या वाढत असल्याने येणाऱ्या काळात कडक निर्बंध लावण्यावर आम्ही विचार करत आहोत. येणाऱ्या काळात दिवसागणिक 20 हजारांपेक्षा कोरोना रुग्ण सापडल्यास आम्ही केंद्राच्या नियमानुसार आणि राज्य सरकारच्या नियमावलीनुसार लॉकडाऊन लावू शकतो, अशी शक्यता महापौरांनी व्यक्त केली. (Kishori Pednekar on Lockdown)

महापौर किशोरी पेडणेकर यांंच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

काल मुख्यमंत्री शिक्षणमंत्री यांनी चांगला निर्णय घेतलाय

प्रत्यक्ष शाळा वर्ग बंद करण्याचा

रुग्ण संख्या वाढतेय, ही बाब चिंताजनक

चिंताजनक बाब लक्षात घेता निरबंध घातली आहेत

दोन डोस झालेले असावेत

शिवसेनेने गर्दी टाळण्यासाठी दोन कार्यक्रम रद्द केलेत

वांद्र्याचा , जत्रेचा शो बंद केलाय

पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी घेतलीय

इतर पक्षाच्या नेत्यांनी देखील या गोष्टी समजून घ्यायला हवं

आपले कार्यकर्ते , लोकांचा बळी जाऊ नये म्हणून मुझ्यन्नत्र्यांनी पुढाकार घेतलाय

अजित दादा देखील काळ बोलले , ५०% उपस्थिती असेल तरच मी समारंभात येईन

सुपरस्प्रेदर होऊ नये म्हणून काळजी घ्या

on आयुक्त

आयुक्त स्वतः सगळ्या गोष्टीत लक्ष ठेवुन आहेत

महानगर पालिका म्हणून आमचं लक्ष आहे

टाळेबंदी नकोच आहे , कारण आता सगळे सवरतायत ,

पण प्रत्येकाने ठरवलं नियम पाळले, कोरोना रोखलं , तर टाळेबंदी

पण २० हजारांच्या वर आकडा गेला , तर केंद्राने दिलेल्या नियानांची पुरतता केली जाईल

मुख्यमंत्री २-३ दिवसात या विषयावर बोलतील

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :kishori pednekar
loading image
go to top