esakal | ओवैसींनी काँग्रेसला म्हटलं 'बँड बाजा पार्टी'; 'भाजपची B टीम' या आरोपावर दिलं प्रत्युत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Owaisi

ओवैसी यांनी नरेंद्र मोदींवर टीका करत म्हटलं की, एका  बाजूला मोदी गांधींना श्रद्धांजली वाहतात तर दुसरीकडे ते गांधींच्या हत्येचा कट करणाऱ्या सावरकरांना पूजतात.

ओवैसींनी काँग्रेसला म्हटलं 'बँड बाजा पार्टी'; 'भाजपची B टीम' या आरोपावर दिलं प्रत्युत्तर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा अद्याप घोषित झाल्या नाहीयेत. मात्र, तरीही राजकीय वातावरण मात्र अगदी तापलेलं आहे. पश्चिम बंगालमध्ये काहीही करुन भाजपला आपली सत्ता आणायची आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाला मागे खेचून तिथे आपलं वर्चस्व कसं साधता येईल याचेही प्रयत्न काँग्रेस आणि एमआयएम सारख्या पक्षाकडून सुरु आहेत. 

MIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं की, जेंव्हापासून आम्ही बंगालच्या निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे, तेंव्हापासून बँड बाजा पार्टी जिला काँग्रेस म्हणून ओळखलं जायचं त्यांनी आम्ही भाजपची बी टीम आहोत, असं म्हणणं सुरु केलं आहे. ममता बॅनर्जी यांनीही असंच म्हणयाला सुरवात केली आहे. यावर ओवैसी यांनी म्हटलंय की, काय मी एकटाच आहे, ज्याबद्दल असं बोललं जाऊ शकतं? मी कुणाचाही नाही, मी फक्त जनतेचा आहे. 

हेही वाचा - Mann Ki Baat : प्रजासत्ताक दिनी तिंरग्याच्या झालेल्या अपमानामुळे देश दुखी - PM मोदी

ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला आहे. हैद्राबादमधून खासदार असणाऱ्या असदुद्दीन ओवैसी कर्नाटक दौऱ्यावर असून त्यांनी कलबुर्गी जिल्ह्यातील एक सभेला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका करत म्हटलं की, एका  बाजूला मोदी गांधींना श्रद्धांजली वाहतात तर दुसरीकडे ते गांधींच्या हत्येचा कट करणाऱ्या सावरकरांना पूजतात.

गांधी हत्येसंदर्भात आणि तपासासंदर्भात एका कमीशनचं नाव घेऊन ओवैसी यांनी म्हटलं की, मी इथे सावरकरांचं नाव देखी घेत आहे कारण सुप्रीम कोर्टाचे रिटायर्ड जज जस्टिस कपूर यांनी देखील सावरकरांचं नाव घेतलं होतं. जस्टिस कपूर कमीशनच्या रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं होतं की, सावरकरांनी महात्मा गांधींच्या हत्येचा कट रचला. 
ओवैसी यांनी गांधींच्या हत्येमध्ये आरएसएसचा देखील हात असल्याचा आरोप केला. सोबतच त्यांनी काँग्रेसवर देखील हल्ला केला की, जर काँग्रेसने या प्रकरणाचा नीट तपास केला असता तर आरएसएसचे नेते अटकेत असते. पुढे त्यांनी म्हटलं की, त्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं.  
 

loading image