भारतात घुसखोरी करणाऱ्या 6 बांगलादेशींना अटक; BSF जवानांची कारवाई I India-Bangladesh Border | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India-Bangladesh Border

बांगलादेश सीमेवर घुसखोरीविरोधात सतत मोहीम राबवली जात आहे.

भारतात घुसखोरी करणाऱ्या 6 बांगलादेशींना अटक; BSF जवानांची कारवाई

10 एप्रिलच्या मध्यरात्री बांगलादेश (Bangladesh) आणि पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवरील (India-Bangladesh Border) उत्तर 24 परगना जिल्ह्यातून 6 बांगलादेशींना अटक करण्यात आलीय. बीएसएफ जवानांनी (BSF) ही कारवाई केलीय. अटक करण्यात आलेल्यांमध्ये तीन महिला, दोन पुरुष आणि एक लहान मुलाचा समावेश आहे. शनिवारी देखील बांगलादेशातून भारतात प्रवेश करताना सहा जणांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, रविवारी तस्करांशी झालेल्या चकमकीत एक तस्कर ठार झाला असून, तिघांना अटक करण्यात आलीय.

बीएसएफनं जारी केलेल्या निवेदनात सांगितलं की, अटक केलेल्यांमध्ये जोयंता बिस्वास (वय 25, राघुनाथपूर, जि. गोपालगंज) रुमा (वय 35, पश्चिम दुमुरिया, जि. बारिसाल) मोसा फातिमा बेगम (वय 29, अलीपूर, जि. पाटुआखाली) मशरू जमान (वय 23, लुटिया, जि. नरेल) व त्यांची पत्नी तस्लिमा जमान (वय 22) आणि 19 महिन्यांचा मुलगा अराफत इस्लाम यांचा समावेश आहे.

हेही वाचा: भगवा घालणाऱ्यांनो तुम्ही दहशतवादीच बना; पुलकित महाराजांचं वादग्रस्त विधान

बांगलादेश सीमेवर घुसखोरीविरोधात सतत मोहीम राबवली जात आहे. या प्रकरणात बीएसएफकडून दररोज बांगलादेशी घुसखोरांना अटक केली जात आहे. बांगलादेश सीमेवर बीएसएफनं पाळत आणि दक्षता वाढवलीय. रविवारी तस्करांशी झालेल्या चकमकीत एक तस्कर ठार झाला, तर तीन जणांना अटक करण्यात आलीय.

Web Title: West Bengal 6 Bangladeshi Arrested While Infiltrating India Bsf

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :bangladeshBSF