esakal | ममतांना दिलासा! पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

Mamata-Banerjee

ममतांना दिलासा! पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीची घोषणा

sakal_logo
By
सुधीर काकडे

कोलकाता - निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील (West Bengal) रिक्त विधानसभा मतदार संघातील तीन आणि ओडिशातील एका जागेसाठी पोटनिवडणूक घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. याच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे.

ममतांचा पारंपरिक मतदारसंघ भवानीपूरसह समशेरगंज आणि जंगीपूर या जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या घोषणेमुळे ममतांना मुख्यमंत्री पदासाठी आवश्यक आमदारकीची अट पूर्ण करता येणार आहे. तृणमूल काँग्रेसकडून पोटनिवडणुकीची मागणी करण्यात येत होती. लवकर निवडणुका झाल्या नसत्या तर ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला असता.

हेही वाचा: केंद्र लादतेय खासगीकरण : चिदंबरम

पश्चिम बंगालमध्ये भवानीपूरसह इतर चार मतदारसंघात ३० सप्टेंबरला मतदान घेण्यात येईल. तर मतमोजणी ३ ऑक्टोबरला होणार आहे. वानीपूरशिवाय समशेरगंज, जंगीपूर आणि पिपली (ओडिशा) मतदारसंघांचाही यामध्ये समावेश आहे. ममता बॅनर्जी यांनी भवानीपूरमधून निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. मात्र कोरोनामुळे मतदान पुढे ढकलण्यात आलं होतं. विधानसभा निवडणुकीवेळी ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढवली होती. त्यांना भाजपच्या सुवेंदु अधिकारी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.

loading image
go to top