esakal | भाजप-तृणमूलच्या रोड शोने प्रचार थंडावला
sakal

बोलून बातमी शोधा

Mamta-and-Amit

बंगालच्या रणधुमाळीत आज दुसऱ्या टप्प्यांतील प्रचाराचा शेवटचा दिवस होता. भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसने संपूर्ण राजकीय शक्ती पणाला लावली. एकीकडे गृहमंत्री अमित शहा यांनी नंदीग्राम येथे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्यासमवेत रोड शो केला तर दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्रामच्याच भागाबेडा येथे व्हिलचेअरवर पदयात्रा केली.

भाजप-तृणमूलच्या रोड शोने प्रचार थंडावला

sakal_logo
By
पीटीआय

नंदीग्राम/कोलकता - बंगालच्या रणधुमाळीत आज दुसऱ्या टप्प्यांतील प्रचाराचा शेवटचा दिवस होता. भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसने संपूर्ण राजकीय शक्ती पणाला लावली. एकीकडे गृहमंत्री अमित शहा यांनी नंदीग्राम येथे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्यासमवेत रोड शो केला तर दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्रामच्याच भागाबेडा येथे व्हिलचेअरवर पदयात्रा केली.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या नंदीग्राम मतदारसंघात येत्या १ एप्रिलला मतदान होत आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मुकाबला टीएमसीतून भाजपमध्ये दाखल झालेले सुवेंदू अधिकारी यांच्याशी होत आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने दिवसभर भाजप आणि तृणमूलच्या उमेदवारासाठी रॅली, रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. रोड शो नंतर अमित शहा यांनी माध्यमांशी बोलताना संपूर्ण बंगालमध्ये बदल घडवून आणायचा असेल तर नंदीग्राम येथे ममता बॅनर्जी यांचा पराभव करायला हवा, असे मत मांडले. नंदीग्रामच्या जनतेला आवाहन करत त्यांनी सुवेंदू अधिकारी यांनी केवळ विजयी करू नका तर प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे नमूद केले. त्याचवेळी नंदीग्रामच्या सोना चौरा येथील सभेत बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जनतेला शांत राहून मतदान करण्याचे आवाहन केले. आपले डोके ४८ तासांसाठी शांत ठेवा आणि तृणमूल कॉंग्रेस मत द्या, असे त्या म्हणाल्या. (कूल-कूल, तृणमूल... ठंडा-ठंडा कूल कूल, वोट पाबे जोडा फूल) नंदीग्राम येथे उभे राहण्याचे कारण सांगता त्या म्हणाल्या, मला भाऊ-बहिण आणि आईचे आशीर्वाद हवेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भाजप २०० जागा जिंकणार
उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना ५० हजाराहून अधिक मतांनी पराभूत करू, असा विश्‍वास व्यक्त केला आहे. तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी बंगालमध्ये जनतेला बदल हवा आहे, असे मत मांडले. त्याची पायाभरणी नंदीग्राम येथे केली जाईल आणि बंगालमधून २०० हून अधिक जागा जिंकू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

ममता यांच्यासमोर जय श्रीरामाच्या घोषणा
नंदीग्रामच्या भागाबेडा  येथील पदयात्रेसाठी ममता निघाल्या असता भाजप कार्यकर्त्यांनी ‘जयश्रीराम’ च्या घोषणा दिल्या. वास्तविक अमित शहा यांचा रोड शो ज्या मार्गावर आयोजित केला होता, त्याच मार्गावरुन ममता बॅनर्जी जात होत्या. यावेळी रस्त्यालगत असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी ममता यांचा ताफा जात असताना जय श्रीरामच्या घोषणा दिल्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुसऱ्या टप्प्यातील मतदान
पश्‍चिम बंगाल - ३० जागा
आसाम - ३९ जागा

Edited By - Prashant Patil

loading image