esakal | West Bengal Election 2021 - पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरवात
sakal

बोलून बातमी शोधा

West Bengal Election

West Bengal Election 2021 - पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरवात

sakal_logo
By
टीम ई सकाळ

West Bengal Assembly Election 2021 - पश्चिम बंगालमध्ये शनिवारी पाचव्या टप्प्यातील मतदान सुरु झालं आहे. 6 जिल्ह्यातील 45 मतदारसंघात आज मतदान घेतलं जाणार असून यामध्ये जवळपास 1 कोटी 13 लाख मतदार त्यांचा कौल देणार आहेत. एकूण 342 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

दार्जिलिंग - मतदानासाठी आलेल्या मतदारांचे थर्मल स्कॅनिंग बूथवर केलं जात आहे. मतदानासाठी मतदारांनी केंद्रावर रांगा लावल्या आहेत.

पश्चिम बंगालसह राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटकसह देशातील इतर काही राज्यात पोटनिवडणूक होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान सुरु होताच एक ट्विट करून मतदारांना आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलं की, देशात वेगवेगळ्या भागात पोटनिवडणूक होत आहे. मतदारांनी विक्रमी मतदान करून लोकशाहीला आणखी बळ देण्यासाठी पुढे यावं.