West Bengal Assembly Election: यशवंत सिन्हा यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

Yashwant Sinha main.jpg
Yashwant Sinha main.jpg

कोलकाता- West Bengal Assembly Election 2021 माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांनी शनिवारी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) प्रवेश केला आहे. त्यांनी पक्षाच्या कोलकाता येथील कार्यालयात जाऊन पक्ष सदस्यत्व घेतले. पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. दिवंगत अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री राहिलेले यशवंत सिन्हा 2014 पासून मोदी सरकारचा विरोध करत आहेत. ते सातत्याने मोदी सरकारच्या धोरणावर टीका करताना दिसतात. 

टीएमसीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर ते आता विधानसभा निवडणुकीत प्रचार करतील असे बोलले जात आहे. आर्थिक धोरणांवरुन त्यांनी सातत्याने मोदी सरकारवर टीका केली आहे. 2014 ते 2019 दरम्यान त्यांचे पुत्र जयंत सिन्हा हे केंद्रात अर्थ राज्यमंत्री होते. त्यावेळीही त्यांनी अनेकवेळा पक्षाच्या नेतृत्त्वावर टीका केली होती. 

पश्चिम बंगालमधील 294 विधानसभा मतदारसंघात 8 टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 27 मार्च रोजी होईल. त्यानंतर 1 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान होईल. तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान 6 एप्रिल मतदान रोजी होईल. दोन मे रोजी मतमोजणी होईल.  

दरम्यान, यशवंत सिन्हा हे पाटणा येथे राहतात. त्यांचे शिक्षणही पाटणा येथेच झाले आहे. 1958 मध्ये राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यानंतर ते 1960 मध्ये आयएएस अधिकारी झाले. आपल्या कार्यकाळात त्यांनी प्रशासनातील अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. त्यांनी 24 वर्षे प्रशासनात काम केले. त्यानंतर 1984 मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि तत्कालीन जनता पक्षात प्रवेश केला. चार वर्षांनंतर 1988 मध्ये ते राज्यसभेवर गेले. तर मार्च 1998 मध्ये अटलबिहारी वाजपेय सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून काम पाहिले. झारखंडमधील हजारीबाग लोकसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केलेले आहे. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा तेथे पराभव झाला. 2009 मध्ये त्यांनी भाजप उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com