esakal | West Bengal Election - कोलकात्यात बॉम्बहल्ला; जिवितहानी नाही

बोलून बातमी शोधा

West Bengal Election - कोलकात्यात बॉम्बहल्ला; जिवितहानी नाही
West Bengal Election - कोलकात्यात बॉम्बहल्ला; जिवितहानी नाही
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी अखेरच्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. गुरुवारी 35 मतदारसंघात 283 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होईल. या टप्प्यात 84 लाखांहून अधिक मतदार मतदान करतील अशी अपेक्षा आहे. आधीच्या टप्प्यांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनामुळे कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

कोलकाता - महाजाती सदन परिसरात बॉम्बहल्ला, कोणतीही जिवितहानी नाही. परिसरात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

बीरभूम - मतदान केंद्र 188 वर ईव्हीएममद्ये तांत्रिक अडचण आल्यानं मतदान अर्धा तास उशिरा सुरु

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून लोकांना कोरोनाच्या प्रोटोकॉलचं पालन करून मतदान करण्याचं केलं आवाहन

आधीच्या टप्प्यांतील हिंसाचार आणि प्रामुख्याने चौथ्या टप्प्यात दहा एप्रिल रोजी पाच व्यक्ती केंद्रीय दलाच्या जवानांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडल्यामुळे सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यात आली आहे. मतदान मुक्त आणि न्याय्य वातावरणात व्हावे म्हणून केंद्रीय दलांच्या ६४१ तुकड्या तैनात करण्यात आल्या असून यातील २२४ तुकड्या बीरभूम जिल्ह्यात आहेत.

मुर्शिदाबाद आणि बीरभूम जिल्ह्यांतील प्रत्येकी ११, माल्डा जिल्ह्यातील सहा आणि कोलकता जिल्ह्यातील सात मतदारसंघांमधील ११ हजार ८६० मतदान केंद्रांवर मतदान होईल. उत्तर कोलकत्यात शशी पंजा आणि साधना पांडे हे तृणमूलचे मंत्री रिंगणात आहेत. पंजा यांनी श्यामपुकूर, तर साधना यांनी माणिकतला मतदारसंघातून लढत आहेत.