esakal | दीदी जिओ दीदी’, बंगाल दुर्गेची पूजा करणारा

बोलून बातमी शोधा

mamata banerjee

दीदी जिओ दीदी’, बंगाल दुर्गेची पूजा करणारा

sakal_logo
By
नामदेव कुंभार

नवी दिल्ली- देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले. निकाल जाहीर होत गेले, तसे सोशल मीडियावरही नेटिझन्स उत्स्फूर्तपणे व्यक्त होऊ लागले. #इलेक्शन रिझल्ट, #नरेंद्र मोदी ग्लोबल पप्पू,#खेलहोबे, #रिझाईन मोदी आदी ट्रेंड त्यात आघाडीवर होते. नेटिझन्सनी मीम्ससह विनोदाचाही वापर केला. त्यामुळे, कोरोनाच्या दुसऱ्या गंभीर लाटेचे सावटही काहीकाळ दूर गेले.

अवघ्या देशाचे लक्ष पश्चिम बंगालच्या निकालांकडे लागले होते. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सत्तेची हॅटट्रिक करणार, हे मतमोजणीच्या काही तासांतील कलांवरून स्पष्ट होऊ लागले. त्यानंतर, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर ट्विटरवरुन शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. मात्र, बहुचर्चित नंदीग्राम मतदारसंघातून ममता बॅनर्जी व भाजपचे सुवेंदू अधिकारी यांच्यातील ‘कांटे की टक्कर’ शेवटपर्यंत कायम राहिली. विजयाचे पारडे कधी अधिकारी तर कधी बॅनर्जी यांच्या बाजूने झुकत होते. त्यामुळे, काही नेटिझन्सनी नंदीग्राममधून अधिकारी, बॅनर्जी दोघेही हरत आहेत, अशी मिश्किल टिप्पणीही केली. काहीजणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीकेची संधी साधली. ‘ममता बॅनर्जी यांनी मोदी-शाह यांच्यासोबतच अनेक केंद्रीय यंत्रणा, प्रसारमाध्यमे अशा अनेकांविरुद्ध असणारी ही लढाई सहजपणे जिंकली आहे,’ ‘पश्चिम बंगाल हा दुर्गेची पूजा करणार आहे,’ ‘एकटीने करुन दाखवले,’ मोदी, शहांना कसे हरवावे, हे ममतांनी दाखवून दिले, अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या.