esakal | मोदींच्या योजना, तर दीदींचा गैरव्यवहार; अमित शहा यांचा हल्लाबोल
sakal

बोलून बातमी शोधा

वाघमुंडी (पुरुलिया) - भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ गुरुवारी आयोजित सभेत उपस्थितांना अभिवादन करताना गृहमंत्री अमित शहा.

पश्‍चिम बंगालच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११५ योजना आणल्या, तर ममतादीदींनी त्यांच्या कार्यकाळात ११५ गैरव्यवहार केले, असा घणाघाती आरोप आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.

मोदींच्या योजना, तर दीदींचा गैरव्यवहार; अमित शहा यांचा हल्लाबोल

sakal_logo
By
पीटीआय

वाघमुंडी (पुरुलिया) - पश्‍चिम बंगालच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११५ योजना आणल्या, तर ममतादीदींनी त्यांच्या कार्यकाळात ११५ गैरव्यवहार केले, असा घणाघाती आरोप आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. पश्‍चिम बंगालमधील पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. यादरम्यान अमित शहा यांनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल करत तृणमूल कॉंग्रेसला पराभूत करण्याचे आवाहन केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुरुलिया जिल्ह्यातील वाघमुंडी येथे प्रचारसभेत बोलताना अमित शहा म्हणाले, की ममता दीदी आपल्याला पिण्यासाठी फ्लोराईडयुक्त युक्त पाणी उपलब्ध करून देते. आपण ममता दीदी यांना सत्तेतून बाहेर केल्यास भाजपचे सरकार आपल्याला स्वच्छ पाणी देईल आणि त्यासाठी १० हजार कोटी रुपये खर्च करेल. डाव्या पक्षांनी पश्‍चिम बंगालमध्ये उद्योग उभारू दिले नाहीत. त्यानंतर दीदींनी उद्योजकांना राज्याबाहेर काढले. मग डावी आघाडी असो किंवा तृणमूल कॉंग्रेस असो दोन्ही पक्षांनी बंगालच्या युवकांना रोजगार दिला नाही.

"रश्मी शुक्लांच्या अहवालात कोणताही घोटाळा समोर आलेला नाही"; गृह सचिवांचं स्पष्टीकरण

जर आपल्या हाताला काम हवे असेल तर बंगालमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. बंगालच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११५ योजना आणल्या. परंतु ममता दीदीने या योजनेची अंमलबजावणी होऊ दिली नाही. यादरम्यान ममता यांनी आपल्या राजवटीत ११५ गैरव्यवहार केले असेही शहा म्हणाले. राज्यात भाजपचे सरकार आल्यास शेतकऱ्यांच्या खात्यात थेट १८ हजार रुपये जमा केले जातील, असे आश्‍वासन दिले. आदिवासी लोकांसाठी देखील भाजपचे सरकार काम करेल, असेही शहा म्हणाले. आदिवासी समाजाच्या विकासासाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. या क्षेत्राला रेल्वेने जोडण्याचे काम सरकारने सुरू केले असल्याचेही ते म्हणाले. 

एप्रिल मध्यावधीमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर; SBIच्या तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

सार्वजनिक क्षेत्रात ३३ टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रत्येक ब्लॉकमध्ये एकलव्य मॉडेल स्कूलची उभारणी केली जाणार आहे. बंगालमधील सर्व महिलांना सार्वजनिक वाहतूक मोफत असेल. दीदी या डेंगी आणि मलेरियासारख्या आहेत. तुम्हाला दोन्ही आजारापासून मुक्त व्हायचे असेल तर भाजपला मत द्यावे लागेल.
- अमित शहा, गृहमंत्री

Edited By - Prashant Patil

loading image