esakal | जनतेचा कौल मान्य, पण कोर्टात जाणार- ममता बॅनर्जी

बोलून बातमी शोधा

mamta-banerjee
जनतेचा कौल मान्य, पण कोर्टात जाणार- ममता बॅनर्जी
sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोलकाता- पश्चिम बंगालमधून मोठी बातमी हाती येतेय. ममता बॅनर्जी यांचा भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी पराभव केल्याचं समजत आहे. ममता यांचा 1200 मतांनी विजय झाल्याची बातमी माध्यमात आली होती. पण, आता पराभव झाल्याचं ममतांनी जवळजवळ मान्य केलंय. असे असले तरी ममता बॅनर्जींच्या नेतृत्त्वातील तृणमूल काँग्रेसने मोठा विजय प्राप्त केला आहे. सध्या तृणमूल 215 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 75 जागांवर आघाडीवर आहे. बंगालमध्ये तृणमूल आणि भाजपमध्ये थेट लढत होते. या लढतीकडे सर्व देशाचे लक्ष लागले होते. मला निकाल मान्य आहे, पण आपण कोर्टात जाणार असल्याचं ममता म्हणाल्या आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर काही फेरफार करण्यात आल्याचा आरोप करत सत्य शोधणार असल्याचं ममता म्हणाल्या आहेत.

नंदीग्रामबाबत काळजी करु नका. मी नंदीग्राममधून लढले कारण ही एक चळवळ होती. ठीक आहे. नंदीग्रामच्या लोकांना जो काही निर्णय द्यायचा आहे देऊ द्या. मला मान्य आहे. मला फरक पडत नाही. पण आम्ही जिंकलो आहोत आणि भाजपचा मोठा पराभव झाला आहे, असं ते ममता म्हणाल्या आहेत. भाजपने घाणेरडं राजकारण केलं. भाजप हरली आहे. निवडणूक आयोगाचे एकांगीपणा आम्हाला सहन करावा लागला, असंही त्या म्हणाल्या.