esakal | गुंड, खंडणीखोरांना ममतांचे प्रोत्साहन; योगी आदित्यनाथ यांचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

yogi adityanath

ममता बॅनर्जी यांना राज्याच्या विकासात रस नसून त्या गुंड, खंडणीखोरांना प्रोत्साहन देत आहेत, असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. तृणमूल सरकारची उलटगणती सुरू झाली आहे.

गुंड, खंडणीखोरांना ममतांचे प्रोत्साहन; योगी आदित्यनाथ यांचा आरोप

sakal_logo
By
पीटीआय

कोलकता - ममता बॅनर्जी यांना राज्याच्या विकासात रस नसून त्या गुंड, खंडणीखोरांना प्रोत्साहन देत आहेत, असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. तृणमूल सरकारची उलटगणती सुरू झाली आहे. राज्यात भाजप सरकार स्थापन करणार असून ३५ दिवसांनंतर विकासाच्या नवीन युगाची सुरुवात होईल, असे प्रतिपादनही त्यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पश्चिम बंगालमधील २४ परगणा जिल्ह्यातील सागर या मतदारसंघातील सभेत ते बोलत होते. आदित्यनाथ म्हणाले, की एकेकाळी पश्चिम बंगाल प्रगत राज्य होते. मात्र, काँग्रेस, डावी आघाडी आणि तृणमूल काँग्रेसमुळे राज्याची औद्योगिक वाढ खुंटली आणि भ्रष्टाचार वाढला. तृणमूलने केंद्रीय निधीचा अपहार केला. राज्याला धडकलेल्या अम्फान चक्रीवादळानंतर दिलेल्या केंद्रीय निधीबाबतही हेच घडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अम्फान चक्रीवादळातून सावरण्यासाठी पश्चिम बंगालला एक हजार कोटींची मदत दिली होती. मात्र, हा निधी लोकांपर्यंत पोचलाच नाही. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उत्तर प्रदेशमधील जनतेला पीएम आवास योजना, उज्ज्वला योजना, आयुषमान भारत आणि किसान सम्मान निधीसारख्या केंद्रीय योजनांचा फायदा मिळत आहे. मग बंगालमधील जनतेला केंद्राच्या योजनांपासून वंचित का ठेवले जाते? यातून तृणमूलला पश्चिम बंगालच्या विकासाशी देणेघेणे नसल्याचे सिद्ध होते.
- योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

Edited By - Prashant Patil