esakal | तलाक बंद केलेला पक्षच पतीला घटस्फोटासाठी प्रोत्साहन देतोय; भाजप खासदाराच्या पत्नीचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

soumitra_20khan

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीआधी राजकारणात अनेक घडामोडी घडून येत आहेत.

तलाक बंद केलेला पक्षच पतीला घटस्फोटासाठी प्रोत्साहन देतोय; भाजप खासदाराच्या पत्नीचा आरोप

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

कोलकाता West Bengal Assembly Elections 2021- पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीआधी राजकारणात अनेक घडामोडी होत आहेत. भाजपचे खासदार सौमित्र खान आणि त्यांची पत्नी, तृणमूल नेता सुजाता मंडळ खान (Sujata Mondal Khan) यांचा कौटुंबिक वाद सार्वजनिक झाला आहे. सुजाता मंडळ यांनी सोमवारी भाजप सोडून तृणमूलमध्ये प्रवेश केला होता, त्यानंतर सौमित्र खान यांनी सार्वजनिकरित्या सुजाता यांना घटस्फोट देण्याची घोषणा केली होती. 

महिलेने इच्छेनुसार लग्न आणि धर्मांतर केल्यास हस्तक्षेप करु शकत नाही- कोर्ट

मंगळवारी सौमित्र खान यांनी आपल्या पत्नीला घटस्फोटाची नोटीस पाठवली. त्यानंतर सुजाता यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ज्या पक्षाने 'तीन तलाक'वर बंदी आणली, तेच आता माझ्या पतीला माझ्यासोबत घटस्फोट घेण्यास सांगत आहेत, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.  
सौमित्र खान आणि सुजाता मंडळ गेल्या 10 वर्षांपासून सोबत आहेत, पण राजकारणात वेगवेगळे मार्ग स्वीकारल्याने त्यांचे संबंध संपण्याच्या मार्गावर आहेत. 34 वर्षांच्या मंडल यांनी सोमवारी टीएमसी जॉईन केली होती. अनेक तृणमूलचे नेते भाजपमध्ये प्रवेश करत असताना त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला. 

सुजाता मंडल यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानं त्यांचे पती आणि भाजप खासदार सौमित्र खान यांनी नाराजी व्यक्त केली. सुजाता यांना त्यांनी घटस्फोटाची नोटीस पाठवली. यासोबतच सुजाता यांच्या घरी तैनात असलेले सुरक्षा रक्षकही काढून घेण्यात आले. सौमित्र खान आणि सुजाता यांच्यात गेल्या काही दिवसांपासून बिनसलं असल्याची चर्चा होती. त्यानंतर दोघांमध्ये वाद असल्याचं समोर आलं. 

जमिनीच्या नोंदीमध्ये हेराफेरी ! पंढरपूर तालुक्‍यात अतिवृष्टी अनुदान घोटाळा आला...

पत्नी तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्यानंतर भाजप खासदार सौमित्र खान यांनी सांगितलं की, हे खरं आहे की आमच्या कुटुंबात मतभेद होते. कुटुंब आहे म्हटल्यावर भांडण होणारच. मात्र याला राजकीय रंग देणं योग्य नाही. मला दु:ख आहे की माझ्या भाजपमध्ये जाण्याने तिला नोकरी गमवावी लागली. सुजाता तिच्या राजकीय महत्त्वकांक्षेसाठी तृणमूलमध्ये गेली आहे. 

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी हालचाली करत आहेत. भाजपने ममतांच्या तृणमूल काँग्रेसमधील 8 नेत्यांना पक्षात घेऊन मोठा हादरा दिला आहे. 

loading image