esakal | महिलेने इच्छेनुसार लग्न आणि धर्मांतर केल्यास हस्तक्षेप करु शकत नाही- कोर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Court_

लग्नानंतर होणारे धर्मांतर हा मुद्दा सध्या चर्चेत आहे.

महिलेने इच्छेनुसार लग्न आणि धर्मांतर केल्यास हस्तक्षेप करु शकत नाही- कोर्ट

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- लग्नानंतर होणारे धर्मांतर हा मुद्दा सध्या चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर कोलकाता उच्च न्यायालयाने एक महत्त्वाची टीप्पणी केली आहे. जर एखादी सज्ञान महिला आपल्या इच्छेनुसार लग्न आणि धर्मांतर करत असेल तर त्यात हस्तक्षेप केला जाऊ शकत नाही. कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यात वडिलांनी दावा केला होता की त्यांच्या मुलीला दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करण्यासाठी चूकीच्या पद्धतीने प्रभावित करण्यात आले होते. 

याचिकेमध्ये वडिलांनी आपल्या 19 वर्षीय मुलीने आपल्या पसंतीच्या व्यक्तीसोबत लग्न केल्याविरोधात याचिका दाखल केली होती. मुलीने मॅजिस्ट्रेटसमोर दिलेली साक्ष  प्रभावित आहे. मुलीवर यासाठी दबाव होता असा दावा वडिलांनी केला. वडिलांनी एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुलीला मॅजिस्ट्रेटसमोर उपस्थित केले होते. त्यावेळी मुलीने आपण आपल्या मर्जीनुसार लग्न केल्याचं म्हटलं होतं. 

'पूछता है भारत'मध्ये पाकविरोधात द्वेष; चॅनेलला भरावा लागणार 20,000...

न्यायमूर्ती संजीव बॅनर्जी आणि न्यायमूर्ती अरिजीत बॅनर्जी यांच्या बँचने सोमवारी म्हटलं की, जर कोणी सज्ञान व्यक्ती आपल्या इच्छेनुसार लग्न किंवा धर्म परिवर्तन करण्याचा निर्णय घेत असेल, तसेच आपल्या वडिलांच्या घरी जाण्यास नकार देत असेल, तर अशा प्रकरणामध्ये कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप केला जाऊ शकत नाही. 

वरिष्ठ अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांसोबत मुलींची भेट घडवून आणली जावी आणि यादरम्यान तिच्यावर कोणताही दबाव आणला जाऊ नये, असं कोर्टाने म्हटलं आहे. दुसरीकडे याचिकाकर्त्याच्या बाजूने पक्ष ठेवणाऱ्या वकील सुष्मिता साहा दत्ता यांनी कोर्टासमोर दावा केला की, मुलगी जेव्हा आपली साक्ष नोंदवल होती, त्यावेळी तिचा पती कोर्ट परिसरात उपस्थित होता. त्यामुळे तिच्यावर दबाव आला होता. 

J&K DDC Poll Results: जम्मू-काश्मीर निवडणुकीत भाजप मोठा पक्ष, 'गुपकार...

वडिलांची शंका दूर करण्यासाठी पुन्हा एकदा अतिरिक्त सरकारी वकील सईबल बापुली यांच्यासमोर 23 डिसेंबर रोजी मुलीची साक्ष घेतली जाणार आहे. यावेळी महिलेसोबत तिचा पती किंवा अन्य कोणीही नसणार आहे. बापुली 24 डिसेंबरला आपला रिपोर्ट कोर्टासमोर ठेवतील.

loading image