'जय श्रीराम'वरून अमित शहांचे बंगालच्या जनतेला 'प्रॉमिस'!

west bengal amit shah
west bengal amit shah

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापलं आहे. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले आहे. भाजपकडून सातत्यानं ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली जात आहे. सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. गुरुवारी कूचबिहारमध्ये एका रॅलीत त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली. यामध्ये ममता बॅनर्जी यांना जय श्रीराम घोषणेवरूनही घेरलं. 

अमित शहा यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधताना म्हटलं की, बंगालमध्ये जय श्रीराम बोलणं गुन्हा असल्यासारखं वातावरण करून ठेवलं आहे. बंगालमध्ये नाही तर पाकिस्तानमध्ये बोलणार का, तुम्हीच सांगा जय श्रीराम बोलायला हवं की नाही. ममता दीदींना हा अपमान वाटतो तुम्हाला वाटतो का असा प्रश्नही रॅलीमध्ये शहा यांनी विचारला. 

संपूर्ण देश आणि जगभरात कोट्यवधी लोक प्रभू रामचंद्राचं नाव घेतात. त्यांना अभिमान वाटतो पण तुम्हाला अपमान वाटतो. मी वचन देतो की निवडणुका संपेपर्यंत ममतादीदी जय श्री राम बोलायला लागतील असंही अमित शहा म्हणाले.

तृणमूल काँग्रेसवर गंभीर आरोप करताना अमित शहा म्हणाले की, टीएमसीच्या गुंडांनी आतापर्यंत 130 भाजप कार्यकर्त्यांची हत्या केली. त्याच्यावर कोणतीच कारवाई केली गेली नाही. आमचं सरकार सत्तेत येताच या खूनी लोकांना तुरुंगात पाठवू असा इशाराही शहांनी दिला. 

पश्चिम बंगाल दौऱ्यावर असलेले अमित शहा आज ठाकुरनगरला पोहोचले आहेत. या भागात मटुआ समाज मोठ्या संख्येनं राहतो. भाजपला या समाजाचा पाठिंबा असल्याचं मानलं जातं. कारण भाजपने यांना सीएए अंतर्गत नागरिकत्व देण्याचं वचन दिलं आहे. भाजपने असा आरोप आहे ममता बॅनर्जींनी त्यांना नागरिकत्व देण्याचं वचन दिलं पण ते पाळलं नाही. दुसऱ्या बाजुला ममता बॅनर्जींनी असं म्हटलं की, कोणाला वेगळं नागरिकत्व देण्याची गरज नाही, सर्वजण भारतीय आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com