esakal | पश्चिम बंगालमध्ये रक्ताचा तुटवडा 
sakal

बोलून बातमी शोधा

पश्चिम बंगालमध्ये रक्ताचा तुटवडा 

कोरेनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी टाळेबंदी करण्यात आल्याने रक्तदान शिबिरेही थंडावली असल्याने पश्चिम बंगालमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे,

पश्चिम बंगालमध्ये रक्ताचा तुटवडा 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

कोलकता - कोरेनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी टाळेबंदी करण्यात आल्याने रक्तदान शिबिरेही थंडावली असल्याने पश्चिम बंगालमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने बुधवारी दिली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांकडून आयोजित केल्या जाणाऱ्या रक्तदान शिबिरांवर लॅाकडाऊनमुळे परिणाम झाला झाला आहे. रक्तदानाचे काम थांबल्यामुळे बंगालमधील रक्तपेढ्यांमध्ये रक्त उपलब्ध होत नाही. यामुळे रक्ताची टंचाई भासत आहे. राज्यातील सुमारे १०८ रक्तपेढ्यांमध्ये ८० टक्के रक्ताचा पुरवठा हा शिबिरांमधून होत असतो, असे `सेंट्रल ब्लड बँके`च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ``रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा पुरवठा होत नाही. थॅलेसेमियाचे रुग्ण आणि ज्यांना नियमित रक्त भरावे लागते अशा रुग्णांवर या तुटवड्यामुळे काय परिणाम होत असेल. खूप कठीण स्थिती निर्माण झाली आहे,`` अशी खंत पीपल्स ब्लड बँकेचे व्यवस्थापकीय संचालक ब्रतिश नियोगी यांनी व्यक्त केली. 

रक्ताची टंचाई असल्याने महत्त्वाच्या शस्त्रक्रियाही पुढे ढकलाव्या लागत आहेत. राज्यात दर महिन्याला सुमारे एक लाख पिशव्या रक्ताची गरज असते, असे लाइफलाइन रक्तपेढीचे संचालक ए. गांगुली यांनी सांगितले. 

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पश्चिम बंगालमधील रक्ताच्या पुरवठ्यावर राज्य सरकारचे बारकाईने लक्ष आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीलवर रक्त संकलनाबाबत सरकार नवी नियमावली लागू करण्याचा विचार करीत आहे. 
चंद्रिमा भट्टाचार्य, आरोग्य मंत्री, प. बंगाल 
 

राज्यातील स्थिती 
१०८ - एकूण रक्तपेढ्या 

१ लाख (दर महिना)  - सरासरी पिशव्यांची मागणी 

८० टक्के  - शिबिरांमधून होणारा पुरवठा