West Bengal Hotel Fire : साखरझोपेत असतानाच मृत्यूने गाठले ! पहाटे हॉटेलला भीषण आग; ७ जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी

Tarapith Hotel Fire : हॉटेलच्या तळमजल्यावरील रिसेप्शन परिसरातून आग सुरू होऊन संपूर्ण इमारतीत पसरल्याचे सांगितले जात आहे.पहाटेच्या वेळी बहुतांश लोक झोपेत असल्याने अचानक धूर पसरल्यानंतर अनेकांनी जीव वाचवण्यासाठी हॉटेलबाहेर धाव घेतली.
West Bengal Hotel Fire

Birbhum Hotel Fire

esakal

Updated on

West Bengal Hotel Fire: पश्चिम बंगालमधील बीरभूम येथे एका हॉटेलला पहाटे भीषण आग लागली या आगीत किमान सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, मात्र मृतांची नेमकी संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. ही घटना पहाटे ४:०० वाजता घडल्याचे माहिती समोर येत आहे. हॉटेलच्या रिसेप्शन एरियामध्ये आग लागली आणि ती संपूर्ण चार मजली इमारतीत पसरली, असा अंदाज आहे. सध्या बचावकार्य सुरू असून जखमींना रुग्णालयात हलवण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com