esakal | पश्चिम बंगालमध्ये भाजप खासदाराच्या घराबाहेर फेकले बॉम्ब; राज्यपालांनी व्यक्त केली चिंता
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप खासदाराच्या घराबाहेर फेकले बॉम्ब; राज्यपालांनी व्यक्त केली चिंता

राज्यपाल जगदीप धनखड यांनी ट्विटरवर चिंता व्यक्त करताना म्हटलं की, पश्चिम बंगालमध्ये हिंसा थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.

भाजप खासदाराच्या घराबाहेर फेकले बॉम्ब; राज्यपालांनी व्यक्त केली चिंता

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोलकाता - पश्चिम बंगालमधील नॉर्थ २४ परगना मतदारसंघाचे भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या घरावर तीन क्रूड बॉम्ब फेकल्याची घटना घडली आहे. त्यांच्या घरी सुरक्षा रक्षक असतानाही ही घटना घढली. मंगळवारी रात्री झालेल्या या प्रकारानंतर राज्याचे राज्यपाल जगदीप धनखड यांनीही चिंता व्यक्त केली आहे. घरावर ज्यावेळी बॉम्ब फेकण्यात आले त्यावेळी खासदार अर्जुन सिंह तिथे नव्हते. मात्र त्यांचे कुटुंबिय घरातच होते. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून तपास करण्याचा प्रयत्न केला.

अद्याप बॉम्ब फेकणाऱ्यांचा शोध लागलेला नाही. या घटेबाबत राज्यपाल जगदीप धनखड यांनी ट्विटरवर चिंता व्यक्त करताना म्हटलं की, पश्चिम बंगालमध्ये हिंसा थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. खासदार अर्जुन सिंह यांच्या घराबाहेर बॉम्ब फेकण्यात आले. कायद्या आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. आशा आहे की, बंगाल पोलिस या प्रकरणी तातडीने कारवाई करतील. त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा आधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर उपस्थित करण्यात आल्याची माहितीसुद्धा राज्यपालांनी दिली.

हेही वाचा: देवेंद्र फडणवीसांवर भाजपने सोपवली नवी जबाबदारी

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणाची सीबीआय़ चौकशी सुरु आहे. हत्या, बलात्कार आणि हिंसाचाराच्या प्रकरणी सीबीआयने एफआयआऱ दाखल करून काही जणांना अटकसुद्धा केली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशावरून सीबीआयने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. याआधी

मानवाधिकार आयोगाच्या एका टीमने हिंसाचारग्रस्त भागाने दौरा करून उच्च न्यायालयाला अहवाल दिला होता. या अहवालाच्या आधारावर सीबीआय़कडे तपास सोपवण्याचा निर्णय़ घेण्यात आला होता. ममता बॅनर्जींचा या चौकशीला विरोध असून त्यांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

loading image
go to top