esakal | देवेंद्र फडणवीसांवर भाजपने सोपवली नवी जबाबदारी
sakal

बोलून बातमी शोधा

देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपने नवी जबाबदारी सोपवली आहे.

देवेंद्र फडणवीसांवर भाजपने सोपवली नवी जबाबदारी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपने नवी जबाबदारी सोपवली आहे. गोव्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची गोवा निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. फडणवीस हे निवडणुकीच्या काळात गोव्यात प्रचारासाठी येत होते.

गोव्यात भाजप निवडणुकीची जबाबदारी कोणत्या नेत्याकडे देणार याची उत्सुकता होती. त्यातही महाराष्ट्रातील नेत्याकडेच ही जबाबदारी सोपवली जाईल असं म्हटलं जात होतं. कारण भाजपने सध्या उत्तर गोव्यातील मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केलं आहे. तसंच फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची भेट घेतली होती.

हेही वाचा: नारायण राणे आज अमित शहांची भेट घेणार?

याआधीही फडणवीस यांनी गोव्यात काम केलं होतं. २००७ च्या निवडणुकीवेळी फडणवीस यांच्याकडे साळगाव मतदारसंघाची जबाबदारी होती. त्यावेळी भाजपच्या उमेदवाराने मतदारसंघात विजय मिळवला होता.

loading image
go to top