भाजपला मोठा दणका; पोटनिवडणुकीत तीनही जागांवर पराभव

West Bengal bypoll Election With sweep TMC regains ground lost after Lok Sabha debacle
West Bengal bypoll Election With sweep TMC regains ground lost after Lok Sabha debacle

कोलकता : पश्‍चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत 18 जागा जिंकणाऱ्या भाजपला पोटनिवडणुकीत दणका बसला आहे. विधानसभेच्या तीन ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागत आहे. कालियागंज आणि खरगपूर सदर येथे तृणमूलचा झेंडा फडकला असून, करिमपूर मतदारसंघात तृणमूलचा उमेदवार आघाडीवर आहे.

कालियागंज येथे तृणमूल कॉंग्रेसचे उमेदवार तपन देव सिन्हा यांनी भाजपचे उमेदवार कमल चंद्रा सरकार यांना 2 हजार 418 मतांनी पराभूत केले. मागील निवडणुकीत ही जागा कॉंग्रेसचे उमेदवार परमानाथन रॉय यांनी जिंकली होती. या वेळी त्यांची कन्या धीरताश्री मैदानात होती. मात्र ती तिसऱ्या क्रमांकावर राहिली. राजगंज लोकसभा मतदारसंघात कालियागंज मतदारसंघाचा समावेश होतो आणि या ठिकाणी भाजपचा खासदार आहे. तसेच खरगपूर सदर येथे तृणमूल कॉंग्रेसचे प्रदीप सरकार यांनी भाजपकडून जागा खेचून आणली. यापूर्वीचे आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष हे मेदिनीपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्याने जागा रिक्त झाली होती.

उद्धव ठाकरे : जे जे स्कूल ऑफ आर्ट्स ते महाराष्ट्राचे 29वे मुख्यमंत्री

करिमपूर मतदारसंघातून तृणमूल कॉंग्रेसचे बिमालेंदू सिन्हा रॉय यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे जयप्रकाश मुजुमदार यांच्यावर 23 हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडी घेतली आहे. कालियागंज आणि करिमपूरची जागा राखण्याची तृणमूल कॉंग्रेसची पहिलीच वेळ आहे. या विजयाबद्धल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जनतेचे आभार मानले असून, भाजपच्या सत्तेच्या अहंकाराला जनतेने मतपेटीतून उत्तर दिल्याची प्रतिक्रिया दिली आहे. हा निकाल पश्‍चिम बंगालच्या जनतेला अर्पण केल्याचे त्या म्हणाल्या. माकप आणि कॉंग्रेसने स्वत:ला बळकट करण्याऐवजी भाजपला मदत केल्याचाही आरोप बॅनर्जी यांनी एका दूरचित्रवाहिनीशी बोलताना केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com