
साधन पांडे हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते.
Sadhan Pandey : बंगाल सरकारमधील कॅबिनेट मंत्र्याचं मुंबईत निधन
पश्चिम बंगाल सरकारमधील (Government of West Bengal) मंत्री साधन पांडे (Sadhan Pandey) यांचं आज सकाळी मुंबईत निधन झालं. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी ट्विटव्दारे ही माहिती दिलीय. पांडे हे बंगाल सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत होते.
दु:ख व्यक्त करताना सीएम ममता यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, आमचे ज्येष्ठ सहकारी, पक्षाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री साधन पांडे (Cabinet Minister Sadhan Pandey) यांचं आज सकाळी मुंबईत निधन झालं. पांडे यांच्याशी दिर्घकाळ चांगला संबंध होता. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला नेहमीच फायदा झालाय. पांडेंच्या या निधनानं पक्षाचं मोठं नुकसान झालंय. या दु:खात मी त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे, असं त्यांनी नमूद केलंय.
हेही वाचा: मोदी लाटेमुळंच काँग्रेसचं सरकार गेलं; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत
साधन पांडे बऱ्याच दिवसांपासून आजारी
साधन पांडे हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. गेल्या वर्षी जुलैमध्येही त्यांना फुफ्फुसात गंभीर संसर्ग झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोलकातामधील एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. छातीत दुखू लागल्यानं आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं पांडे यांना रात्री उशिरा रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु, आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
Web Title: West Bengal Cabinet Minister Sadhan Pande Passed Away Today Morning Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..