esakal | 'एनआरसी', 'कॅब'विरोधात ममता बॅनर्जी उतरल्या रस्त्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

Mamata Banerjee

आज ममता बॅनर्जी पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरलेल्या दिसल्या. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये या दोन्ही कायद्यांना लागू करण्यास विरोध केला आहे. त्यामुळे आता देशात केंद्र विरुद्ध राज्य अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

'एनआरसी', 'कॅब'विरोधात ममता बॅनर्जी उतरल्या रस्त्यावर

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कोलकता : देशभरात लागू झालेल्या राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिका (एनआरसी) आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (कॅब) विरोध करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज (सोमवार) रस्त्यावर उतरल्या. त्यांना हे दोन्ही कायदे पश्चिम बंगालमध्ये लागू करणार नसल्याचे स्पष्ट केलेले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पश्‍चिम बंगालमध्ये नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्या तृणमूल काँग्रेसने या विरोधात राज्यभर सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे येथील रस्त्यांवर तृणमूल विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. मेघालय, आसाम, शिलाँगमध्ये तणाव आहे. नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिका (एनआरसी) पश्‍चिम बंगालमध्ये लागू केली जाणार नसल्याच्या जाहिराती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तेथील स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध केल्या आहेत.

जामीया इस्लामिया विद्यापीठाबाहेर जाळपोळ, बस पेटवल्या; 'कॅब' विरोधाला हिंसक वळण