
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीय दुलाल सरकार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दुलाल सरकार यांच्यावर दुचाकीस्वार हल्लेखोरांनी भरदिवसा गोळ्या झाडल्या. पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील झलझालिया मोर भागात दुचाकीस्वारांनी भरदिवसा ही घटना घडवली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.