नवाब मलिक प्रकरणानंतर ममतांचा पवारांना फोन; केली महत्त्वाची चर्चा

ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यात 10 मिनिटे चर्चा झाली.
Sharad Pawar Mamta
Sharad Pawar Mamtasakal

Nawab Malik : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अटकेनंतर राज्यासह देशातील राजकीय वर्तूळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. नवाब मलिक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊ नये, असे मत ममता यांनी व्यक्त केले असून, या मुद्द्यावर स्वतः राष्ट्रवादीच्या पाठीशी असल्याचे आश्वासन ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांना दिले आहे. (Mamata Banarjee Call To Sharad Pawar In Nawab Malik Case )

Sharad Pawar Mamta
नवाब मलिकांचा राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही - भुजबळ

ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यात जवळपास 10 मिनिटे चर्चा झाल्याचे सांगण्यात येत असून, केंद्रीय एजन्सींच्या गैरवापराच्या मुद्द्यावर विरोधकांनी एकजूट करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे ममता बॅनर्जी यांनी अनेकदा म्हटले आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या मुंबईतील घरी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला राष्ट्रवादीसह काँग्रेसचे नेते उपस्थित होते. दरम्यान, अटकेनंतर मी लढेन, घाबरणार नसल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. (Nawab Malik Latest News In Marathi)

मलिकांचा राजीनामा घेणार नाही; सरकारकडून भूमिका स्पष्ट

नवाब मलिक यांच्यावरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत त्यामुळं त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, अशा शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडी सरकारची भूमिका पत्रकार परिषदेद्वारे स्पष्ट केली. मलिक यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालयाने छापे टाकले. त्यानंतर सकाळपासून त्यांची चौकशी सुरू होती. (Nawab Malik ED Enquiry News) एकूण चार मालमत्तांची चौकशी सकाळपासून सुरू होती. मलिक यांच्या कुटुंबीयांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची पडताळणी ईडीकडून सुरू होती. त्यानंतर आता नवाब मलिकांना कोर्टात हजर करण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com