ममता बॅनर्जी आज पंतप्रधान मोदींच्या भेटीला, काय होणार चर्चा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi-Mamata Banerjee

ममता बॅनर्जी आज पंतप्रधान मोदींच्या भेटीला, काय होणार चर्चा?

नवी दिल्ली : त्रिपुरामध्ये तृणमूल काँग्रेसच्या युवा शाखेच्या प्रमुख शायनी घोष यांना हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यानंतर सोमवारी दिल्लीत भलताच आक्रमक पवित्रा घेऊन केंद्र सरकारवर दबाव वाढवला. त्यानंतर आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) या पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Modi) भेट घेणार आहेत. यामध्ये त्रिपुरातील घटनेबद्दलच चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत तृणमूलकडून माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा: Explainer : पंतप्रधान मोदींनी तीन कृषी कायदे का मागे घेतले? वाचा सविस्तर

त्रिपुरामध्ये मुख्यमंत्री बिप्लब देब यांची जाहीर सभा सुरू होती. त्यावेळी शायनी घोष आणि त्यांच्या सहकार्यांना दगडफेक केल्याचा आरोप राज्य सरकारने केला आहे. घोष यांनी तातडीने अटक केल्यामुळे भाजपविरोधात तृणमूल काँग्रेस असा वाद सुरू आहे. त्रिपुरामधील हिंसाचाराला तृणमूल काँग्रेस जबाबदार नाही, असा दावा तृणमूलने केला. त्यानंतर ममता यांनी तृणमूलच्या खासदारांना तातडीने दिल्लीत रवाना होण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार तृणमूलच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर तृणमूलच्या शिष्टमंडळाला शाह यांनी भेटण्यासाठी वेळ दिला. यावेळी त्रिपुरात आणखी हिंसा होऊ नये व कोणाविरोधात बनावट गुन्हे दाखल केले जाऊ नयेत ही तृणमूलची मागणी होती. त्यानंतर त्रिपुरामध्ये हिंसक घटना होणार नाहीत, असे आश्वासन शाह यांनी दिलं होतं.

ममता बॅनर्जी आज पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. त्यानंतरही त्या राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांची भेट घेणार आहेत. त्यासाठीच तृणमूलच्या खासदारांनी मंगळवारी दिवसभर वातावरण निर्मिती केल्याचे बोलले जात आहे.

loading image
go to top