
ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'मलाही पेगाससची ऑफर, पण मी नाकारली; कारण..'
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पेगासस बाबात मोठा खुलासा केला आहे, त्यांना 4-5 वर्षांपूर्वी इस्रायलचे गुप्तचर सॉफ्टवेअर पेगाससची सेवा ऑफर करण्यात आली होती, तसेच त्यासाठी त्यांनी 25 कोटी रुपयांची मागणी केली होती असे देखील त्यांनी सांगितले. मात्र त्याचा वापर करणे मान्य नसल्यामुळे त्यांनी ही ऑफर नाकारल्याचे देखील स्पष्ट केले.
ते (NSO ग्रुप, इस्रायली सायबर इंटेलिजन्स कंपनी) 4-5 वर्षांपूर्वी आमच्या पोलीस विभागात त्यांचे मशीन (पेगासस स्पायवेअर) विकण्यासाठी आले होते आणि त्यांनी 25 कोटी रुपयांची मागणी केली होती; मी ते नाकारले कारण त्याचा राजकीय वापर न्यायाधीश/अधिकारी यांच्या विरोधात केला जाऊ शकतो, जो अमान्य आहे" असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.
हेही वाचा: भगवंत मान यांचा भ्रष्टाचाराविरोधात मोठा निर्णय; देणार पर्सनल व्हॉट्सअॅप नंबर
मला या सॉफ्टवेअरबद्दल आधीच माहिती होती. हे अत्यंत धोकादायक आहे. आंध्र प्रदेश (संयुक्त) मध्ये चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री असताना त्यांची सेवा तेथे घेण्यात आली. सध्याचे केंद्र सरकारही या माध्यमातून सर्व नेते, न्यायाधीश, अधिकारी, पत्रकार आदींच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावत आहे. पण मला तसे करायचे नाही असे देखील त्यांनी सांगितले. पश्चिम बंगाल विधानसभेत ममता बॅनर्जी विधानसभेत बजेट संबंधी चर्चेला उत्तर देत होत्या. "चंद्राबाबूंच्या काळात ते आंध्र सरकारकडे होते. ते धोकादायक आहे. मला लोकांच्या भाषण स्वातंत्र्यावर अतिक्रमण करायचे नव्हते", असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा: रेडमीचा स्वस्त स्मार्टफोन लॉंच; मिळेल 50MP कॅमेरा, फास्ट चार्जिंग
Web Title: West Bengal Cm Mamata Banerjee Says Offered Pegasus 4 5 Years Ago She Turned It Down
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..