esakal | ट्विटरच्या खांद्यावर बंदूक ठेवत ममतांचा केंद्रावर वार; म्हणाल्या...
sakal

बोलून बातमी शोधा

ट्विटरच्या खांद्यावर बंदूक ठेवत ममतांचा केंद्रावर वार; म्हणाल्या...

ट्विटरच्या खांद्यावर बंदूक ठेवत ममतांचा केंद्रावर वार; म्हणाल्या...

sakal_logo
By
विनायक होगाडे

देश : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज गुरुवारी मोठं विधान केलंय. केंद्र सरकारवर जहरी टीका करताना त्यांनी म्हटलंय की, दुर्दैवाने केंद्र सरकार ट्विटरला ताब्यात आणू शकत नाही, म्हणून ते ट्विटरला जमीनदोस्त करु इच्छित आहेत. त्याचप्रकारे ते मला देखील कंट्रोल करु शकत नाहीत, म्हणून ते माझ्या सरकारला पाडू इच्छित आहेत. त्यांनी हे सगळं बंद करायला हवं. ममता बॅनर्जी यांनी हे देखील म्हटलंय की, यास चक्रीवादळानंतरच्या नुकसानाची भरपाई म्हणून देखील केंद्र सरकारकडून अद्याप पश्चिम बंगालला कोणतीही रक्कम मिळाली नाहीये.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार ट्विटरला नियंत्रित करत असल्याचा आरोप करत सरकारच्या धोरणांची निंदा केली. त्यांनी असा दावा केलाय की, केंद्र सरकार ट्विटरला ताब्यात घेण्यात अयशस्वी झाल्यानंतर ट्विटरचा प्रभावच नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांनी याच प्रकाराची तुलना आपल्या सरकारशी करत म्हटलंय की, केंद्र सरकार हा प्रकार आमच्यासोबत देखील करु पाहत आहे.

ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पुढे म्हटलंय की, मी या प्रकाराचा निषेध करते. ते ट्विटरला नियंत्रित करु शकत नाहीयेत म्हणूनच आता ते त्यांना प्रभावहीन करण्याचा प्रयत्नात आहेत. ते प्रत्येकासोबतच हा प्रकार करत आहेत जे त्यांच्यासोबत जाऊ इच्छित नाहीत. ते मलाही नियंत्रित करु शकत नाहीत, त्यामुळेच ते माझ्या सरकारला प्रभावहीन करण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा: गाझीयाबाद मारहाण प्रकरण: स्वरा भास्कर, ट्विटरच्या प्रमुखाविरोधात तक्रार

हेही वाचा: गोवा ट्रीपचं नियोजन करताय? जाणून घ्या निर्बंधांची स्थिती!

पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसा सुरु असण्याच्या आरोपावर देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी म्हटलंय की, ही भगवा पार्टीची चाल आहे आणि त्यांचे हे दावे पूर्णपणे आधारहीन आहेत. त्यांनी म्हटलंय की, राज्यात कसल्याही राजकीय हिंसा होत नाहीयेत. एक-दोन लहान-सहान घटना घडल्यात ज्यांना राजकीय हिंसेचा शिक्का मारला जाऊ शकत नाही. ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय की, पश्चिम बंगालमध्ये कसल्याही प्रकारची राजकीय हिंसा झालेली नाहीये. आम्ही हिंसेचा निषेधच करतो. राजकीय हिंसा करणं ही भाजपचीच रणनीती आहे. त्यांनी उत्तर प्रदेशात जावं जिथं मृतदेह गंगा नदीत तरंगत आहेत.

loading image
go to top