बंगालमध्ये दुर्गा विसर्जनावेळी बॉम्ब हल्ला; अनेकजण जखमी

बंगालमध्ये दुर्गा विसर्जनावेळी बॉम्ब हल्ला; अनेकजण जखमी
Summary

देशी बॉम्ब फेकल्यानंतर मोठा आवाज झाल्यानं लोकांमध्ये गोंधळ उडाला. काहींनी यावेळी हल्ला करत गाड्यांची तोडफोडही केली.

पश्चिम बंगालच्या दुर्गापूर इथं शनिवारी रात्री दुर्गा विसर्जनासाठी गेलेल्या भाविकांवर बॉम्ब फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. देशी बॉम्ब फेकल्यानंतर मोठा आवाज झाल्यानं लोकांमध्ये गोंधळ उडाला. काहींनी यावेळी हल्ला करत गाड्यांची तोडफोडही केली. दुर्गापुरच्या अन्नपूर्णा भागात दुर्गा विसर्जनावेळी हा प्रकार घडला असून पोलिस याचा अधिक तपास करत आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दुर्गापूरच्या अन्नपूर्णा भागात शनिवारी रात्री दुर्गा विसर्जन करून काही लोक परत निघाले होते. यावेळी काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. दोन्ही गटात दारुवरून आधी भांडण झालं होतं अशीही माहिती समजते. जेव्हा एक गट मूर्ती विसर्जन करून परत येत होता तेव्हा दुसऱ्या गटाने त्यांना रस्त्यात अडवलं आणि दारुसाठी पैसे मागितले. यावरून दोन्ही गटांमध्ये भाडंण झालं आणि त्यातच मारहाणसुद्धा झाली.

बंगालमध्ये दुर्गा विसर्जनावेळी बॉम्ब हल्ला; अनेकजण जखमी
Kerala Rain - भूस्खलनासह वेगवेगळ्या दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू

दोन्ही गटांमधील वाद इतके विकोपाला गेले की दुसऱ्या गटातील लोकांनी बॉम्बने हल्ला करण्यास सुरुवात केली. बॉम्बच्या आवाजाने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी वाहनांची तोडफोडसुद्धा करण्यात आली. हल्लेखोर बॉम्बफेक केल्यानंतर तिथून फरार झाले.

घटनेनंतर पोलिसांनी लोकांना शांत केले आणि जखमी झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल केलं. पोलिस अधीक्षक ध्रुवज्योती मुखर्जी यांनी सांगितलं की, दोन गटात झालेल्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. हल्लेखोरांची ओळख पटलेली नाही. त्यांचा शोध घेतला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com