esakal | "अधिकारी म्हणाला, नंदीग्राममध्ये फेरमतमोजणी घेतल्यास जीवाला धोका"
sakal

बोलून बातमी शोधा

mamta-banerjee

"नंदीग्राममध्ये फेरमतमोजणी घेतल्यास जीवाला धोका"

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

कोलकाता- ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला पश्चिम बंगालमध्ये मोठा विजय मिळाला असला तरी, ममतांना नंदीग्राम मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागलाय. कधीकाळी त्यांचे सहकारी असणाऱ्या आणि आता भाजपवासी झालेल्या सुवेंदू अधिकारी यांनी त्याचा पराभव केलाय. नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाच्या निकालाबाबत गोंधळ पाहायला मिळाला. आधी ममता बॅनर्जी 1200 मतांनी विजयी झाल्याचे सांगण्यात आले, त्यानंतर काही वेळाने सुवेंदू अधिकारी विजय झाल्याची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी गंभीर आरोप केले आहेत.

नंदीग्राममध्ये फेर मतमोजणी घेतल्यास जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, असं रिटर्निंग अधिकाऱ्याने म्हटल्याचा दावा ममतांनी केला आहे. ममतांनी एका एसएमएसचा हवाला दिला आहे. ''मला एकाकडून मेसेज मिळालाय ज्यात रिटर्निंग अधिकाऱ्याने एकाला लिहिलं आहे की, त्याने फेर मतमोजणीला परवानगी दिल्यास त्याच्या जीवाला धोका निर्माण होईल. त्यामुळे मी फेर मतमोजणीचा आदेश देऊ शकत नाही. माझं कुटुंब उद्धवस्त होईल, मला छोटी मुलगी आहे.'' ममता मोबाईलमधून हा मजकूर वाचत होत्या.

हेही वाचा: पश्चिम बंगाल : बॉम्बस्फोटात भाजपचे 6 कार्यकर्ते जखमी

ममतांचा सुवेंदू अधिकारी यांनी 1700 पेक्षा अधिक मतांनी पराभव केलाय. पण, त्यांच्या या विजयावर तृणमूलने आक्षेप घेतलाय. मतमोजणीत फेरफार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. ममतांनी थेट कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलाय. नंदीग्राममधील मतमोजणीदरम्यान सलग 4 तास सर्व्हर बंद असल्याचा आरोपही ममतांनी केलाय. राज्यपालांनी माझे अभिनंदल केले होते, पण अचानक सर्वकाही बदललं, असं ममता म्हणाल्यात.

तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ''पक्ष निवडणूक आयोगाकडे जाणार आहे. नंदीग्राममध्ये मोठा घोळ झालाय. पक्षाने जोरदार विजय प्राप्त केला असताना मुख्यमंत्र्यांच पराभव कसा झाला. काही मोठं कारस्थान झालंय.'' पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या तृणमूलने 213 जागांवर विजय मिळवलाय, तर भाजपला 77 जागा मिळाल्या आहेत. बंगालमध्ये 292 जागांसाठी निवडणूक झाली होती.

loading image