esakal | जया बच्चन भरणार ‘तृणमूल’च्या प्रचारात रंग; ममतादीदींसाठी घेणार सभा
sakal

बोलून बातमी शोधा

Jaya_Bachchan

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आयोजनाखाली पश्‍चिम बंगालमध्ये होणाऱ्या चित्रपट महोत्सवांना जया बच्चन यांचे पती आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे नेहमी हजेरी असतात. येथील जनता त्यांना ‘आपला जावई’च मानते.

जया बच्चन भरणार ‘तृणमूल’च्या प्रचारात रंग; ममतादीदींसाठी घेणार सभा

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

West Bengal Assembly Election 2021: कोलकता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या ब्रिगेड परेड मैदानावरील सभेत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अभिनेता मिथुन चक्रवर्ती भाजपच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. तृणमूल काँग्रेसने याला उत्तर देण्यासाठी मिथुन यांच्यासमोर ज्येष्ठ अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांना उतरविण्याचा निर्णय घेतला आहे.

जया भादुरी-बच्चन या मूळच्या बंगाली असून बंगाली विनोदी प्रेमपट ‘धनई मेये’मधून ‘१९७१ मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. ‘बांगला बांगलर मेये मे के चाई’ (बंगालमधील जनतेला बंगाली मुख्यमंत्री हवा आहे.) ही ‘तृणमूल’ची घोषणा जया बच्चन यांच्या प्रचारातून सातत्याने पुढे आणण्यात येणार आहे.

VIDEO: योगी आदित्यनाथांनी पत्रकाराला शिवी दिली? व्हायरल व्हिडीओमागे काय आहे सत्य?​

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आयोजनाखाली पश्‍चिम बंगालमध्ये होणाऱ्या चित्रपट महोत्सवांना जया बच्चन यांचे पती आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे नेहमी हजेरी असतात. येथील जनता त्यांना ‘आपला जावई’च मानते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन जया बच्चन यांनी ‘तृणमूल’ने प्रचारात सहभागी करून घेतले आहे. जया बच्चन यांच्या व्यतिरिक्त समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह हेही ममता बॅनर्जींसाठी प्रचारात उतरणार आहेत.

अनिल देशमुखांनी दिल्लीत घेतली सिंघवींची भेट; सुप्रीम कोर्टात जाण्याबाबत खलबतं?​

निवडणूक प्रतिनिधीपदी महिलांची नियुक्ती?
दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील मतदानावेळी ‘तृणमूल’च्या पुरुष निवडणूक प्रतिनिधीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच ‘तृणमूल’च्या काही प्रतिनिधींनी भाजपशी हातमिळवणी केली असल्याचा संशय असल्याने पुढील मतदानाच्यावेळी निवडणूक प्रतिनिधी म्हणून महिलांची नेमणूक करण्याची सूचना ममता बॅनर्जी यांनी केली आहे. पण ही सूचना पक्षासाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. कारण मतदान केंद्रांवर प्रतिनिधी म्हणून काम करण्‍यासाठी अनुभवी महिलांची संख्या पक्षात पुरेशी नाही.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image