esakal | 'ममतांनी पराभवानंतरही मुख्यमंत्री होणं नैतिकतेत बसत नाही'

बोलून बातमी शोधा

'ममतांनी पराभवानंतरही मुख्यमंत्री होणं नैतिकतेत बसत नाही'
'ममतांनी पराभवानंतरही मुख्यमंत्री होणं नैतिकतेत बसत नाही'
sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोलकाता - पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री पदी ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) तिसऱ्यांदा विराजमान होणार आहेत. कोरोनामुळे अत्यंत साधेपणाने हा शपथविधी होणार आहे. दरम्यान, यावरून आता त्रिपुराचे (Tripura) मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव (Biplab Kumar Deb) यांनी ममता बॅनर्जी यांनी राजकीय मर्यादेची आठवण करून दिली आहे. बिप्लव कुमार देव यांनी ममता बॅनर्जींना उद्देशून असं म्हटलं की, तुम्ही नंदीग्राममधून (Nandigram) निवडणूक हारला आहात. जनादेश तुमच्या बाजुने नाही. मी निवडणूकीत पराभूत झालो असतो तर मुख्यमंत्री कधीच होऊ शकलो नसतो. पक्षाला माझा निर्णय सांगितला असता. आता नंदीग्रामच्या जनतेनं ममता बॅनर्जींना नाकारलं आहे. ते लोकही पश्चिम बंगालचे आहेत बाहेरचे नाहीत असेही बिप्बव देव म्हणाले.

बिप्लव देव यांनी म्हटलं की, जनता ही सर्वोच्च असते. त्यांच्या निर्णयाचा स्वीकार करून पालन करायला हवं. पश्चिम बंगालच्या जनतेनं भाजपला प्रमुख विरोधी पक्ष ठरवलं आहे. पक्ष ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही पश्चिम बंगालच्या जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करू.

हेही वाचा: Sakal Impact : आमदार पवारांनी महामार्गाच्या निकृष्ट कामाची गडकरींकडे केली तक्रार ! 

भाजप कार्यालयात पत्रकारांशी बोलताना बिप्लव कुमार देव यांनी म्हटलं की, पश्चिम बंगालसह सर्व पाच राज्यात भाजपला आणखी बळ मिळालं आहे. पश्चिम बंगालमध्ये मतांची टक्केवारी 10 टक्क्यांहून 38 टक्क्यांवर पोहोचली आहे. तर जागासुद्धा 3 वरून 77 इतक्या झाल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा पश्चिम बंगाल विधानसभेत काँग्रेसचा एकही आमदार नाही अशी अवस्था झाली आहे. राज्यात 34 वर्षे सत्तेत राहिलेल्या कम्युनिस्ट पक्षालासुद्धा एकही आमदार निवडून आणता आला नाही. भाजपच्या निकालावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना बिप्लव देव यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपने कमी काळात मोठी झेप घेतल्याचं सांगत उत्तर दिलं.

बंगालमध्ये सत्तास्थापनेला वेग आला असून ममतांची तृणमूलच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. आज ममता बॅनर्जी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. दरम्यान बंगालमध्ये होत असलेल्या हिंसाचाराच्या विरोधात भाजप देशभर आंदोलन करत आहे.