Alapan Bandyopadhyay
Alapan Bandyopadhyay

केंद्राची अलपन बंडोपाध्याय यांना नोटीस; होऊ शकतो तुरुंगवास

Summary

केंद्र सरकार आणि पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारमधील वाद वाढत जाण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली- केंद्र सरकार आणि पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारमधील वाद वाढत जाण्याची शक्यता आहे. कारण, केंद्र सरकारने मंगळवारी पश्चिम बंगालचे माजी मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय (West Bengal chief secretary Alapan Bandyopadhyay ) यांना आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत Disaster Management Act नोटिस पाठवली आहे. चक्रीवादळ यास संबंधातील केंद्राच्या बैठकीला 15 मिनिटे उशिरा रिपोर्ट केल्याने त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. बंडोपाध्याय या दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत होते.

सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार डीएम कायद्यांच्या सेक्शन 51(b) अंतर्गत त्यांच्यावर एक वर्षाची कारवाई केली जाऊ शकते. केंद्र सरकारच्या या कारवाईमुळे केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यामधील तणाव वाढणार आहे. गृहमंत्रालयाने माजी अधिकारी अलपन बंडोपाध्याय यांना तीन दिवसात लेखी उत्तर देण्यास सांगितलं असून डीएम कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी तुमच्यावर कारवाई का केली जाऊ नये,अशी विचारणा केली आहे.

Alapan Bandyopadhyay
'अनलॉक'साठी केंद्र सरकारचे नवे नियम

माहितीनुसार, बंडोपाध्याय यांचे उत्तर समाधानकारक नसल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. डीएम कायद्यांच्या सेक्सन 51(b) अंतर्गत केंद्र सरकार किंवा राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या (आपत्ती व्यवस्थापन) निर्देशांचं (कोणतेही सबळ कारण नसताना) पालन केले नसल्यास शिक्षा केली जाऊ शकते. या अंतर्गत दोन वर्षांची शिक्षा केली जाऊ शकते. बंडोपाध्याय यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या National Disaster Management Authority (NDMA) बैठकीला दांडी मारली होती. पंतप्रधान मोदी या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत.

Alapan Bandyopadhyay
माजी न्यायाधीश अरुण मिश्रा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवे अध्यक्ष

पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांसोबत बैठक होती. यावेळी पंतप्रधानांनी 15 मिनिटे मुख्य सचिवांच्या येण्याची वाट पाहिली. अधिकाऱ्यांनी मुख्य सचिवांना बैठकीसाठी येणार आहात काय, याबाबत विचारणा केली. त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय बैठकीसाठी हजर झाले. पण, त्यांनी लगेच दुसऱ्या बैठकीचा हवाला देत तिथून पळ काढला, असं नोटीसमध्ये म्हणण्यात आलंय. ममता सरकार केंद्र सरकारच्या या नोटिसीला सविस्तर उत्तर देण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अलपन बंडोपाध्याय प्रकरण चर्चेत आहे. त्यांना यापूर्वी केंद्राने त्यांना राज्याच्या सेवेतून मुक्त होत दिल्लीत रिपोर्ट करण्यास सांगितलं होतं. पण, त्यांनी तसं केलं नाही. त्यानंतर, ममता बॅनर्जी यांनी सांगतलं की बंडोपाध्याय सेवेतून मुक्त होत आहेत आणि ते पुढील तीन वर्ष टीएमसी सरकाचे प्रमुख सल्लागार म्हणून काम करतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com