

Bangladesh News
esakal
West Bengal Minister: पश्चिम बंगालचे परिवहन मंत्री अर्जुन सिंह यांनी शेजारील देश बांगलादेशबाबत केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. बांगलादेशातील हिंदूंच्या हत्यांचा बदला घेण्यासाठी येत्या १६ डिसेंबरपर्यंत आपण बांगलादेश ताब्यात घेऊ, असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले आहे.
''आता खूप झाले, बांगलादेशासाठी यापुढे कोणतीही सबब चालणार नाही आणि तेथे ज्या प्रकारे हिंदूंची हत्या करण्यात आली आहे, त्याचा बदला आपण नक्कीच घेऊ, याबाबत कोणतीही शंका नाही,'' असे विधान अर्जुन सिंह यांनी केले आहे.