

Maharashtra Teacher Gets 20 Years Jail for Sexual Assault on Minor Student Baramati Court Imposes 45000 Rupees Fine
sakal
बारामती : अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी शिक्षक किशोर धनुशा ऊर्फ आप्पाण्णा मधुरे (वय 34, रा. पुणे) याला बारामती येथील जिल्हा न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी दोषी ठरवत २० वर्षे कारावासाची शिक्षा आणि ४५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. या निकालामुळे बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये कायद्याची कठोर अंमलबजावणी होत असल्याचा महत्त्वपूर्ण संदेश समाजामध्ये गेला आहे.