

MLA Car Bomb Attack: Shaukat Molla Targeted in Bhangar, Political Tensions Escalate in West Bengal
esakal
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा हिंसेच्या आगीत सापडले आहे. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील भांगड परिसरात तृणमूल काँग्रेसचे आमदार शौकत मोल्ला यांच्या गाडीवर बॉम्ब फेकण्याची धक्कादायक घटना घडली. पोलरहाट बाजार परिसरातून परतत असताना रात्री उशिरा ही घटना घडली. सुदैवाने आमदार मोल्ला यांना काही इजा झाली नाही आणि ते सुरक्षित राहिले.