

Supreme Court
esakal
नवी दिल्ली: पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरपडताळणीशी (एसआयआर) संबंधित लवादाच्या कामकाजावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. ‘‘अशा वेगाने काम चालले तर पुढच्या निवडणुका येतील, ’’ असा शेरा सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी मारला. ‘‘केवळ अपील दाखल होणे महत्त्वाचे नाही तर त्या अपिलांच्या निपटाऱ्यांची संख्या देखील महत्त्वाची आहे, तसेच लवादाच्या कामाचा आढावा घेणेही आवश्यक आहे, ’’ असे न्या. जॉयमाल्या बागची यांनी स्पष्ट केले.