esakal | "देशाचं विभाजन होताना असं घडलं होतं"; बंगाल हिंसाचारावर नड्डांची प्रतिक्रिया

बोलून बातमी शोधा

jp nadda

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेचा निकाला लागला. पण, रविवारपासून राज्यात हिंसाचार सुरु झाला आहे. विविध ठिकाणी तोडफोड, जाळपोळ आणि हत्येच्या घटना समोर आल्या आहेत.

"देशाचं विभाजन होताना असं घडलं होतं"
sakal_logo
By
कार्तिक पुजारी

कोलकाता west bengal violence- पश्चिम बंगालमध्ये विधानसभेचा निकाला लागला. पण, रविवारपासून राज्यात हिंसाचार सुरु झाला आहे. विविध ठिकाणी तोडफोड, जाळपोळ आणि हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. तृणमूल काँग्रेसचे गुंड कार्यकर्त्यांवर हल्ले करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा jp nadda पश्चिम बंगालमध्ये पोहोचले आहेत. त्यांनी तृणमूलवर गंभीर आरोप करताना म्हटलं की, असली असहिष्णुता आम्ही कधीच पाहिली नाही. निकालानंतर जो हिंसाचार पाहायला मिळतोय तो झटका देणारा आहे, अशा घटनांनी आम्ही चिंतीत आहोत. (west bengal violence bjp jp nadda mamta banarjee tour kolkata)

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर जेपी नड्डा दोन दिवसीय कोलकाता दौऱ्यावर आले आहेत. यावेळी ते म्हणाले की, देशाचे विभाजन होताना अशा घटना घडल्याचं ऐकलं होतं. आपण देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर अशा प्रकारची असहिष्णुका पाहात आहोत. बंगालमध्ये तानाशाही सुरु असून टीएमसीचा लोकशाहीवर विश्वास नाही. टीएमसीचे गुंड भाजप कार्यकर्त्यांना मारताहेत. टीएमसीच्या गुंडानी  २ गॅंग रेप  केलेत. बंगाल मतमोजणीनंतर आतापर्यंत ११ भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचं नड्डा यांनी सांगितले. भाजप घाबरणारा पक्ष नाही, आम्हाला  कुणी रोखू शकत नाही, असंही नड्डा म्हणाले.

हेही वाचा: प. बंगालमधील हिंसाचारप्रकरणी भाजपची सुप्रीम कोर्टात धाव

पश्चिम बंगालमध्ये रविवारी विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले, तेव्हापासून राज्यातील अनेक भागात हिंसा भडकली आहे. बंगालच्या अनेक जिल्ह्यात तोडफोड, जाळपोळ, लूटपाट, हत्येच्या तक्रारी समोर येत आहेत. भाजपने या हिंसेसाठी तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरलं आहे. भाजपने आरोप केलाय की, नंदीग्राम, कोलकाता, आसनसोलसह अनेक भागात त्यांचे समर्थक, कार्यकर्त्यांची दुकाने लूटण्यात आली, घरांना आग लावण्यात आली. एवढेच नाही, तर महिलांवर बलात्कार करण्यात आले आहेत, अनेक कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे.