हिंसाचार उसळलेल्या बंगालात आणखी एका TMC नेत्याची गोळ्या झाडून हत्या

West Bengal Violence
West Bengal Violenceesakal
Summary

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना थांबताना दिसत नाहीयत.

West Bengal Violence : पश्चिम बंगालच्या (West Bengal) बीरभूम जिल्ह्यात दहा जणांचा बळी घेणाऱ्या हिंसाचाराच्या संबंधात किमान 22 लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आली असल्याचं एका वरिष्ठ पोलीस (Police) अधिकाऱ्यानं सांगितलंय. तृणमूल काँग्रेसचा पंचायत नेता भदू शेख (Trinamool Congress Panchayat Leader Bhadu Sheikh) याच्या सोमवारी झालेल्या हत्येनंतर रामपूरहाट शहराच्या सीमेवरील बोगतुई खेड्यातील जवळपास 10 घरांवर पेट्रोल बॉम्बच्या साहाय्यानं हल्ला करण्यात आला होता. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शेख याच्या मुलांचा समावेश असल्याचा दावा शेख कुटुंबीयांनी केलाय.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना थांबताना दिसत नाहीत. बीरभूममध्ये 10 जणांना जिवंत जाळण्याचं प्रकरण अजूनही थंडावलं नाहीय, तोच आता नादिया जिल्ह्यात (Nadia District) टीएमसीच्या (TMC) एका नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडलीय. सहदेव मंडल (Sahadeva Mandal) असं पीडितेचं नाव आहे. सहदेव हे टीएमसीचे स्थानिक कार्यकर्ते होते. सहदेव यांच्या पत्नी अनिमा मंडल या बागुला ग्रामपंचायतीच्या सदस्या आहेत.

West Bengal Violence
काँग्रेस अध्यक्ष कोण होणार? शनिवारी पक्षाची महत्वपूर्ण बैठक

बुधवारी रात्री सहदेव रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत स्थानिकांना दिसला. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना आरोग्य केंद्रात नेलं. मात्र, प्रकृती खालावल्यानं त्यांना कृष्णानगर, शक्तीनगर येथील रुग्णालयात (Hospital) पाठवण्यात आलं. परंतु, तिथं सहदेव यांचा मृत्यू झाला. दरम्यान, पश्चिम बंगालमधील बीरभूममध्ये टीएमसीच्या पंचायत नेत्याची हत्या करण्यात आलीय. यानंतर 21 मार्च रोजी संपूर्ण जिल्ह्यात हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झालाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com