बंगालला हवे परिवर्तन - पंतप्रधान मोदी

वृत्तसंस्था
Tuesday, 23 February 2021

‘पश्‍चिम बंगालने आता परिवर्तनाचा निर्धार केला असून मा माटी आणि मानुषची घोषणा देणारेच  विकासासमोर भिंतीसारखे उभे ठाकले आहेत,’’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर घणाघात केला.

हुगळी (प.बंगाल) - ‘पश्‍चिम बंगालने आता परिवर्तनाचा निर्धार केला असून मा माटी आणि मानुषची घोषणा देणारेच  विकासासमोर भिंतीसारखे उभे ठाकले आहेत,’’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर घणाघात केला. पंतप्रधानांच्या हस्ते आज विविध विकास कामांचे उद्‌घाटन झाले पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र यावेळी उपस्थित राहणे टाळले.

मोदी म्हणाले, ‘राज्याने आज विकासाच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. या आधीच्या सरकारांनी योग्य पद्धतीने विकास घडवून आणला नाही. प्रगत देशांच्या श्रीमंतीचे कारण हे त्यांनी योग्य वेळी उभारलेल्या पायाभूत प्रकल्पांमध्ये दडले आहे. आमच्या देशामध्ये देखील हे काम काही दशकांपूर्वीच होणे अपेक्षित होते पण ते होऊ शकले नाही. आता राज्यामध्ये वेगाने हे प्रकल्प उभारले जात असून रेल्वे आणि जलमार्गांचा देखील झपाट्याने विकास होतो आहे.’’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मोदी म्हणाले

  • रस्त्यांचा वेगाने विस्तार
  • महामार्गांमुळे मोठा लाभ
  • किसान रेलमुळे शेतकऱ्यांना बाजारपेठ
  • मेट्रोच्या विस्तारीकरणाचा लोकांना फायदा
  • तुष्टीकरणाच्या राजकारणात देशभक्ती गायब
  • ‘शोनार बांगला’साठीच प्रयत्न
  • राज्य सरकारने शेतकऱ्यांचे हक्क हिरावले
  • ज्यूट उत्पादकांना राज्याने वाऱ्यावर सोडले

VIDEO - दुकानदारांचा रस्त्यात राडा; पाणीपुरी खायला आलेल्यांच्या काळजाचं झालं 'पाणी-पाणी'

‘संरक्षण क्षेत्रातही खासगी भागीदारीला प्रोत्साहन’ 
संरक्षण क्षेत्रात खासगी भागादारी अत्यावश्‍यक असून जागतिक पातळीवर एक प्रमुख शस्त्र निर्यातदार देश म्हणून भारत लवकरच अग्रेसर होईल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. संरक्षण विभागाच्या वेबीनारला मोदी यांनी आज संबोधित केले. 

मंत्र्यांना बसावं लागतंय आकाशपाळण्यात; डिजिटल इंडियात नेटवर्कसाठी खटाटोप

मोदी म्हणाले, ‘‘भारत हा जगातील मोठ्या संरक्षण सामग्री खरेदीदारांपैकी एक देश आहे. ही परिस्थिती बदलणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीनेच संरक्षण क्षेत्रातील खासगी भागीदारी इतक्‍या मोठ्या प्रमाणावर वाढविण्याचे प्रयत्न होत आहेत. आज भारत जगातील ४० देशांना सस्त्रास्त्रे विकतो. ही यादी वाढत जाईल.

आत्मनिर्भर भारताची निर्मिती संरक्षण क्षेत्राच्या आत्मनिर्भरतेशिवाय अशक्‍य आहे. आम्ही लढाऊ शस्त्रसामग्रीलाच प्राधान्य देण्याचे धोरण ठेवले पाहिजे तरच या क्षेत्रातील अवलंबित्व कमी होऊ शकते. ‘तेजस’ विमानांना आमच्या सरकारने केवळ फायलींबाहेरच काढले नाही तर या विमानाच्या मारक क्षमतेवर प्रचंड विश्‍वास दाखवला. त्याचाच परिणाम म्हणजे भारतीय बनावटीचे हे विमान आज यशस्वी भरारी घेत आहे.’’ 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: west Bengal wants change narendra modi politics