Cyclone Biporjoy: बिपॉरजॉय चक्रीवादळानं काय नुकसानं केलंय? गृहमंत्री अमित शाहांनी सांगितली आकडेवारी

चक्रीवादळाच्या नुकसानीचा आढावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला.
Cyclone Biparjoy:
Cyclone Biparjoy:

Cyclone Biporjoy : बिपॉरजॉय चक्रीवादळानं गुजरातच्या किनारपट्टीला अक्षरशः झोडपून काढलं. यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसानंही झालं आहे. याच्या नुकसानीचा आढावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला तसेच पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. (What damage has been done by Cyclone Biporjoy HM Amit Shah told statistics)

शहा म्हणाले, बिपॉरजॉय चक्रीवादळाचा भारताच्या पश्चिम किनारपट्टीला तडाखा बसला आहे. यामध्ये ४७ लोक जखमी झाले आहेत, पण यांपैकी कोणीही गंभीर स्थितीत नाही. २३४ जनावरांना मात्र यामध्ये प्राण गमवावे लागले. यामध्ये जुनागड, कच्छ, जामनगर, द्वारका, धीरसोमनाथ, मोरबी आणि राजकोट या जिल्ह्यांना या चक्रीवादळा फटका बसला. तरी पण खूपच कमी नुकसान झाल्यानं गुजरात सरकार यासाठी अभिनंदनास पात्र आहे. (Latest Marathi News)

नुकसानीपासून किती आणि काय वाचलं?

दरम्यान, वीजेच्या तारा पडून गंभीर परिस्थिती उद्भवू नये यासाठी ३४०० गावांमधील वीज बंद करण्यात आली होती. त्यांपैकी १६०० गावांत वीज पुन्हा सुरु झाली आहे. २० जूनच्या संध्याकाळी ६ पर्यंत सर्वच्या सर्व गावांत वीज पुन्हा सुरु होणार आहे. १२०६ गर्भवती महिलांना सुरक्षित रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

चक्रीवादळाच्या तीन दिवसांच्या काळात ७६० महिलांनी सुरक्षितरित्या बाळांना जन्म दिला आहे. एकूण १ लाख ८ हजार २०८ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आलं. त्याचबरोबर ७३००० जनावरांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आलं. तसेच मोठे वृक्ष उन्मळून पडू नयेत यासाठी ३ लाख २७ हजार ८९० वृक्षांची व्यवस्थित पणे कटिंग करण्यात आली, असंही शहा यांनी यावेळी सांगितलं. (Marathi Tajya Batmya)

PM मोदींनी घेतली दखल

तसेच चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकण्यापूर्वी सर्व प्रकारची बचावात्मक पूर्वतयारी करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. पंतप्रधानांनी स्वतः ज्या राज्यांना हे चक्रीवादळ धडकणार होतं त्या राज्यांच्या प्रतिनिधींशी तसेच बचाव पथकांच्या तयारीबाबत संबंधीत एजन्सीजच्या प्रतिनिधींशी देखील संवाद साधला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com