अंतिम वर्षांच्या परीक्षांचं काय होणार, केंद्राने घेतलाय 'हा' निर्णय...  

अंतिम वर्षांच्या परीक्षांचं काय होणार, केंद्राने घेतलाय 'हा' निर्णय...  

मुंबई : अखेरच्या वर्षाच्या परिक्षा रद्द केल्याचा प्रस्ताव महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यूजीसीकडे पाठवला आहे, त्या निर्णयाचे काय झाले याची प्रतिक्षा विद्यार्थ्यांना असतानाच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी अंतिम वर्षाच्या परिक्षा होणार असल्याचे सांगितले आहे. 

देशभरात अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्याची मागणी होत असतानाच केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशांक यांनी एका हिंदी वृत्तवाहिनी एनडीटिव्हीला दिलेल्या मुलाखतीत या परिक्षा होतील असे सांगितले आहे. एवढेच नव्हे तर या परिक्षा जुलै आणि ऑगस्टमध्ये होतील तर पहिल्या आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अंतर्गत गुण तपासणीच्या आधारे निकाल लावण्यात येईल असे सांगितले. 

कोणत्याही विद्यार्थ्यांचे वर्ष फुकट जाऊ नये हेच आमचे लक्ष्य आहे. त्याचबरोबर त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यास, त्यांच्या परिक्षा घेण्याचे आम्ही ठरवले आहे. उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची 1 जुलैपासून परिक्षा होईल. शाळेच्या शिल्लक राहिलेल्या परिक्षाही होतील. महाविद्यालयीन सत्र ऑगस्टपासून सुरु होईल, तोपर्यंत या परिक्षा झालेल्या असतील. अंतिम परिक्षांबद्दल राज्य आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकेल. विद्यार्थी हे आमची अमूल्य संपत्ती आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी जे काही शक्य असेल, ते सर्व आम्ही करणार आहोत, असे निशांक यांनी सांगितले.

दहावी आणि बारावीच्या अपूर्ण राहिलेल्या परिक्षा जुलैत होऊ शकतील आणि त्यानंतरच निर्णय होईल. याबाबतचा अंतिम निर्णय त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. याबाबतचा निर्णय घेण्यापूर्वी आरोग्य तसेच गृह मंत्रालयाचा सल्ला घेण्यता येईल, असे त्यांनी सांगितले. 

केंद्रीय मंत्र्यांनी परिक्षा जुलैत होईल असे सांगितले आहे, पण तोपर्यंत कोरोनाची साथ आटोक्यात न आल्यास काय निर्णय होईल याबाबत ते म्हणाले, परिस्थिती सुरळीत झाली असेल हा मला विश्वास आहे. हे झाले नसेल तर गृह आरोग्य मंत्रालयाबरोबर चर्चा करण्यात येईल तसेच विद्यार्थी आणि पालकांचेही मत जाणून घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

what decision will be taken about about last year exams central government have already decided this

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com